नारायण गावस, पणजी :गोवा विधानसभघेचे हिवाळी अधिवेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हाेणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली. पणजी येथे काणकोण येथे हाेणाऱ्या लोकाेत्सवाविषयीची माहिती देताना सभापतींनी वरील माहिती दिली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन हाेणार असून लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे, असे सभापती म्हणाले.
एसटी समाजाला २०२७ मध्ये आरक्षण
एसटी समाजाला २०२७ पर्यंत राजकीय आरक्षण दिले जाणार आहे. काही लोक आताच आरक्षण द्यावे अशी मागणी करत आहे. पण ते शक्य नाही सरकारने आरक्षण द्यायचे आधीच आश्वासन दिले आहे. यासाठी मुख्यमंत्री तसेच इतर शिष्टमंडळ लवकर केंद्रीय मंत्री आमित शाह यांना भेटणार आहे. एसटी समाजाच्या आरक्षण हे येत्या विधानसभेच्या निवडणूकीत मिळणार आहे. त्यामुळे काेणीही सरकारवर दबाव आणू नये. हे सरकार एसटी समाजासोबत आहे. असेही यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.
कोमुनिदाद जागेतील घरे कायम करण्याचा निर्णय चांगला
कोमुनिदाद जागेतील घरे लोकांच्या नावावर करण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे. आमचे स्थानिक गोमंतकीय लोक गेली अनेक वर्षे या कोमुनिदाद जागेत राहत आहेत. त्यांना त्यांची हक्काची घरे मिळणे गरजेचे आहे. आमच्या काणकोण मतदारसंघात एका आगाेंदा भागाताच ६० टक्के घरे ही काेमुनिदात जागेत आहेत. हे सर्व मुळ गोमंतकीय लाेक आहेत. तसेच काणकोणातील नुकतेच ७० कोमुनिदातील घरांना मोडण्याचे आदेश आले होते. आम्ही याच्यावर स्थगिती आणली आहे. सरकारचा हा निर्णय चांगला असल्याचे सभापती रमेश तवडकर म्हणाले.
सभापतीपदी समाधानी
मला मंत्रीपदाची इच्छा नाही कधीच पक्षाकडे मंत्रीपद मागितले नाही तसेच मागणार नाही. मी ज्या पदावर आहे तीथे समाधानी आहे. तसेच सभापती पदी राहूनही मला अनेक सामाजिक कामे करायला मिळत आहे. तसेच काणकोण मतदारसंघात मला अनेक विकास कामे करायला मिळत आहे. मला मंत्रीपदाची इच्छा नाही असेही यावेळी सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.