नारायण गावस
पणजी: जानेवारी २०२४ पर्यंत ५० बंधाऱ्यांची कामे हाती घेतली जाणार आहे. नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत निविदा जारी केली जाणार आहे, असे जलस्त्राेत मंत्री सुभाष शिराेडकरांनी सांगितले. सचिवालयातील एका कार्यक्रमावैळी ते पत्रकारांशी बोलत हाेते.जलस्त्राेत खात्याने जलसंर्वधनाचा पुढाकार घेतला असून राज्यात १०० बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
जलस्त्राेत मंत्र्याच्या नुसार येत्या पावसाळ्यापूर्वी ६० ते ७० बंधारे बांधून पूर्ण हाेणार आहे. यामुळे लोकांची पिण्याचा पाण्याची समस्या सुटणार आहे. पुढील तीन महिने कामाची निविदा जारी केली जाणार आहे. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.
चांगल्या कामांना विरोध करु नका
बंधारे बांधणे हे आवश्यक आहे यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पण काही जण याला विरोध करत आहे. प्रत्येक विकास कामाला लोकांनी विरोध करु नये. बंधारे बांधण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवरील लाेकांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. पाण्याचा समस्या सोडविण्यासाठी बंधारे बांधणे अंत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण याला ाविरोध करु नये. ज्या ठिकाणी खरोखरच पर्यावरणाची समस्या उद्भवत आहे तिथे सरकार पर्यायी व्यवस्था करते, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
पुशुसंवर्धन मंत्र्यांशी बैठक घेण्यात आली असून ज्या दुधव्यावसायिक शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे त्यांना चतुर्थीपूर्वी पैसे दिले जाणार असे मंत्र्यांनी या बेैठकीत आश्वासन दिले आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पैसे चतुर्थीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा हाेणार आहे. तसेच कामधेनु याेजने विषयी गावागावात मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी आम्ही या याेजना विषयी प्रचार प्रसार करणार आहे, असे मंत्री शिराेडकर म्हणाले.