शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

या वर्षीही सात कोटींच्या विदेश सहली!

By admin | Published: August 11, 2015 1:37 AM

विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटन खाते मंत्री-आमदारांचे विदेश दौरे आणि ‘जंकेट टूर्स’ आयोजित करते. यावर प्रखर टीका होऊनही सरकारने या वर्षीही विविध मौजेच्या

राजू नायक ल्ल पणजी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटन खाते मंत्री-आमदारांचे विदेश दौरे आणि ‘जंकेट टूर्स’ आयोजित करते. यावर प्रखर टीका होऊनही सरकारने या वर्षीही विविध मौजेच्या सहलींवर सात कोटींवर रुपये उधळण्याचे निश्चित केल्याची अंतर्गत गोटातील माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे. जगातील सात प्रमुख देशांत या मौजेच्या सहली होणार आहेत. त्यांची कंत्राटे सात प्रवासी पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांना वाटून दिली आहेत. या कंपन्यांनी आपसात स्पर्धा करण्याऐवजी आपापसात मिळून आणि राजकीय उच्चपदस्थांना खुश करून राजीखुशी नफा कमवावा, अशी ती कल्पना आहे. या मौजेच्या सहली मॉस्को, पॅरिस, सिंगापूर, लंडन, स्पेन, बर्लिन व इस्राईल या देशांमध्ये होणार आहेत. ज्या कंपन्यांना ही कंत्राटे मिळणार आहेत, त्यांच्यासह ही कंत्राटे ज्या रकमांना मिळाली आहेत, त्याची यादीच ‘लोकमत’ला उपलब्ध झालेली आहे. ही यादी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही, हे विशेष. मॉस्को येथील सहलीसाठी ९९ लाख ३७ हजार ४९४ कंत्राट देण्यात येणार आहे. हे कंत्राट मुंबईस्थित ‘गोल्ड माईन’ कंपनीला मिळणार आहे. या यादीत ‘शॉन’ व ‘विन्सन’ अशा दोन गोमंतकीय कंपन्या आहेत. त्यांना इस्राईल तसेच पॅरिस व सिंगापूरची कंत्राटे मिळणार आहेत. ‘विन्सन’ कंपनीला पॅरिसचे कंत्राट ८८ लाख ३८ हजार ४२० रुपयांना, तर सिंगापूरचे कंत्राट १ कोटी २७ लाख २६ हजार ९६० रुपयांना देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. अ‍ॅलिका पर्पल, एएमओ, क्रेयोंग, गोल्ड माईन, शॉन व विन्सन अशा सहा कंपन्यांना ही कंत्राटे वाटून देण्यात आली असून ‘मिळून सारेजण’ या सहकार्याच्या धोरणामुळे गोव्याचे पर्यटन खाते आवडीचे खाते बनले आहे.