पणजी - येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणा-या 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इस्रायलच्या नामांकित अभिनेत्री व लेखिका गिला आल्मागोर यांना निमंत्रित केले जाणार आहे. तसेच शोले चित्रपटावर यावेळच्या इफ्फीत विशेष लक्ष देऊन अमिताभ बच्चनसोबतइफ्फीत संवादाचा कार्यक्रम ठेवला जाणार आहे. इफ्फी अस्थायी समितीशीनिगडीत सुत्रंकडून ही माहिती प्राप्त झाली. इफ्फीची जाहिरात करण्यासाठी आठवडाभर अगोदर फुटबॉलचा सामना आयोजित करण्याचाही आयोजकांचा विचार आहे.
यावर्षी इफ्फीसाठी इवेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी नियुक्त करण्याचे काम गोवा मनोरंजन संस्थेकडेच सोपविले गेले आहे. गेल्या इफ्फीर्पयत चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) इवेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी नियुक्त करण्याचे काम करत होते. मग या कंपनीकडून चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाचा व समारोपाचा सोहळा आयोजित केला जात होता. अलिकडेच माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड यांची मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्यासोबत बैठक झाली व त्यावेळी यंदापासून हे काम मनोरंजन संस्थेने इवेन्ट मॅनेजमेन्ट कंपनीकडून करून घ्यावे असे ठरले. यामुळे इवेन्ट मॅनेजमेन्ट कंपनीची नियुक्ती मनोरंजन संस्था करणार आहे. पूर्वी डीएफएफ आणि मनोरंजन संस्था यांच्यामध्ये जो संघर्ष होत होता तो आता होऊ शकणार नाही असे अपेक्षित आहे.
इफ्फीसाठी यावेळी इ ायल ही फोकस कंट्री आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी मंडळाचा भाग म्हणून इ ायलच्या गिला आल्मागोर यांना निमंत्रित केले जाणार आहे. 1975 सालच्या शोले चित्रपटावर यावेळी विशेष भर दिला जाईल. एमर्जिग टेलंट असा नवा पुरस्कार यावेळच्या इफ्फीवेळी दिला जाणार आहे. इफ्फीच्या प्रसिद्धीसाठी गोवा पर्यटन खात्याकडून ऑडिओ-व्हीडीओ क्लीप तयार केले जाईल.
दरम्यान, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक सिंथिल राजन हे शुक्रवारी गोव्यात दाखल झाले आहेत. इफ्फीची तयारी सर्व आघाडय़ांवर सुरू झाली असून राजन यांच्यासह विविध अधिका-यांनी तयारीत भाग घेतला आहे.
इवेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी नियुक्तीचे अधिकार ईएसजीला आले आहेत ही खरी गोष्ट आहे. ईएसजीने विविध प्रकारे ईफ्फीची तयारी सुरू केली आहे. इफ्फी प्रतिनिधींसाठी व पाहुण्यांसाठी गेल्यावर्षी ज्या हॉटेल्सचे आरक्षण केले होती, तिच हॉटेल्स यावेळीही असतील. कारण हॉटेल व्यवस्थापनांसोबतचा आमचा करार हा तीन वर्षाचा आहे.
- अमेय अभ्यंकर, सीईओ मनोरंजन संस्था