शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

कूळ कायदा दुरुस्ती मागे घ्यावीच लागेल!

By admin | Published: May 21, 2015 1:24 AM

पणजी : गोमंतक बहुजन महासंघाची अधिकृत स्थापना येत्या २४ रोजी तपोभूमी-कुंडई येथे ब्रह्मेशानंद स्वामींच्या हस्ते होणार आहे. ओबीसी, अनुसूचित

पणजी : गोमंतक बहुजन महासंघाची अधिकृत स्थापना येत्या २४ रोजी तपोभूमी-कुंडई येथे ब्रह्मेशानंद स्वामींच्या हस्ते होणार आहे. ओबीसी, अनुसूचित जातीजमाती मिळून २४ समाज या महासंघाच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. जाचक कूळ कायदा दुरुस्ती त्वरित रद्द करावी, या प्रमुख मागणीसह बहुजन समाजाच्या हिताचे काही महत्त्वाचे ठराव या वेळी मंजूर केले जाणार आहेत.पत्रकार परिषदेत महासंघाचे नेते प्रकाश शंकर वेळीप व कार्याध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेला महिनाभर बाराही तालुक्यांमध्ये बहुजन समाजात जागृतीसाठी सभा घेण्यात आल्या. बहुजन समाजाचे ज्वलंत प्रश्न घेऊन महासंघ पुढे जाणार आहे. कूळ तसेच अन्य प्रश्नांवर सरकारला लवकरच निवेदन सादर केले जाणार आहे. महासंघाची ५२ उद्दिष्टे असून त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू, असे वेळीप यांनी सांगितले.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्रातील वर्धा येथील खासदार रामदास तडस, वास्को चर्चचे फादर मायकल फर्नांडिस उपस्थित राहाणार आहेत. आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांना निमंत्रण दिले होते; परंतु पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते येऊ शकणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. तपोभूमीवर रविवारी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.वेळीप म्हणाले की, बहुजन समाजात सुशिक्षित बेकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर दुसरीकडे सरकारी खात्यांमध्ये एससी, एसटी, ओबीसींच्या हक्काच्या १0 हजारांहून अधिक पदांचा बॅकलॉग आहे, तो लवकरात लवकर भरला जावा. सुमारे ५ हजारपेक्षा अधिक बढत्या अडलेल्या आहेत, त्या विनाविलंब द्याव्यात.वेळीप म्हणाले, राज्यात ३ लाखांपेक्षा अधिक कुळे आहेत. त्यांच्यावर या जाचक दुरुस्तीमुळे अन्याय झालेला आहे. १९७६ साली भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ या कायद्याने शेतकऱ्यांना जमिनीचे अधिकार दिले होते, ते काढून घेतले जात आहेत.राज्यात एससी, एसटी, ओबीसींची मिळून ४१ टक्के लोकसंख्या आहेत. अनुसूचित जमातींचे लोक रानात वास्तव्य करून राहतात. (पान २ वर)