फोंडा : मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ढवळी येथील एका हॉटेलसमोर झालेल्या दोन दुचाकींच्या टक्करीत मोहम्मद रफीक (१८, रा. ढवळी) याचे जागीच निधन झाले. या अपघातात साईश नाईक (१६, रा. ढवळी) हा जखमी झाला असून त्याला अधिक उपचारार्थ गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. वाजे-शिरोडा येथील राजेश नाईक हा १९ वर्षीय युवक आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी जीए-0१-के-४१७७ क्रमांकाच्या दुचाकीवरून शिरोड्याहून फोंड्याकडे येत होता. त्याचवेळेस ढवळी जंक्श्नजवळ त्याला साईश नाईक हा मित्र शाळेत जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत राहिलेला दिसला. राजेशच्या आग्रहावरून साईश त्याच्यासोबत टॉप हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी निघाला. त्याचवेळी ढवळी येथील मोहम्मद रफीक हा जीए-0५-एच-६२0३ क्रमांकाच्या दुचाकीवरून दूध आणण्यासाठी तिस्क-फोंडा येथे गेला होता. तो दूध घेऊन पुन्हा घराकडे निघाला असता दोन्ही दुचाकींची टॉप हॉटेलसमोर टक्कर झाली. यात मोहम्मद याच्या छातीला जबरदस्त मार लागला. त्याला त्वरित फोंड्यातील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातात साईश नाईक यालाही गंभीर मार लागला होता. त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमधून गोमेकॉत नेण्याची तयारी केली असता ड्युटीवरील डॉक्टरांनी अॅम्बुलन्स देण्यास टाळाटाळ केल्याचे या वेळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले. ड्युटीवरील महिला डॉक्टरांनी केवळ एकट्या रुग्णाला पाठवण्यासाठी (पान २ वर)
ढवळी येथे अपघातात युवक ठार, एक जखमी
By admin | Published: August 19, 2015 1:46 AM