शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

गोव्यात राष्ट्रवादीशी युतीस काँग्रेसचा नकार

By admin | Published: January 16, 2017 5:42 AM

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त नेते चर्चिल आलेमाव यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला

पणजी : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त नेते चर्चिल आलेमाव यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसचा कोणताही संबंध राहणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. या निर्णयामुळे आलेमाव व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. गोवा फॉरवर्डचे प्रणेते आमदार विजय सरदेसाई यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष निवडणुकीत कोणाबरोबरही युती करणार नाही. मात्र, गोवा फॉरवर्डबरोबर जागा वाटप करील. काँग्रेसला राष्ट्रवादीबरोबर युती करण्याची मुळीच इच्छा नाही. गोवा फॉरवर्डबरोबर युती केली असती तर राष्ट्रवादीबरोबरही करावी लागली असती. आलेमाव यांच्यासोबत काँग्रेसचे कोणतेही संबंध नको, अशी भूमिका श्रेष्ठींनी घेतली आहे. . (विशेष प्रतिनिधी)राहुल गांधींचा नकार : काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होणार होती; पण चर्चिल आलेमाव यांच्याशी काहीच संबंध नको, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली होती. त्यानंतर निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीसोबत २०१२ मध्ये काँग्रेसची युती होती.