गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोंदिया येथील पथकाने ४ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कारवाईत नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १ लाख २९ हजार ५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. मोहफुलाच्या दारूभट्ट्यांवर धाड घालून दारू व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. विमला चिखलोंडे यांच्या घरून ४५ लिटर मोहफुलाची दारू, मूर्री येथील मुकेश शेंडे याच्याकडून २९ लिटर मोहफुलाची दारू, अमीन सफी शेख चिरेखनी तलावाच्या काठावर ८८० लिटर मोफुलाचा सडवा ठेवला होता. देवरी येथील रामेश्वर चिखलोंढे याच्याकडून ३० लिटर मोफुलाची दारू, तिरोडाच्या संत रविदास वॉर्डातील २१५० लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले.
१ लाख २९ हजारांचे दारूनिर्मितीचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:25 AM