गोंदिया: घरात एकटीच असलेल्या गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालय कंमांक २ व अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी जिल्हा न्यायाधीश कं २ व अति. सत्र न्यायाधीश एन.डी. खोशे यांनी २९ डिसेंबर रोजी केली आहे. निलकंठ प्रभू कावळे (३३) रा. महारीटोला ता. आमगाव असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या पालकांनी १५ मार्च २०१७ ला आमगाव पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या ३० वर्षाच्या गतिमंद मुलीवर आरोपीने अत्याचार केला होता. परिस्थिती हलाकीची असल्याने पालक मजूरीसाठी आमगाव येथे गेले होते.
घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. यातून तीला गर्भधारणा झाल्याने आमगाव पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम ३७६ (२) (एल) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रविण राठोड यांनी केला होता. तपासामध्ये आरोपीची संशयाच्या आधारावर चौकशी केली. आरोपीने गुन्हा कबूल केला व पिडिता ही मतिमंद होती व ती घरी एकटी राहत असल्याचा फायदा घेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे कबुल केले होते. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर न्यायालय जिल्हा न्यायाधीश कं २ व अति. सत्र न्यायाधीश एन.डी. खोशे यांनी भादंविचे कलम ३७६ (२-एल) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व २ हजार रूपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास ६ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेश दिले.मासिक पाळी न आल्याने घरच्यांना आला संशय३० वर्षाच्या त्या गतिमंद मुलीला २-३ महिन्यापासून मासिक पाळी न आल्याने १० मार्च २०१७ रोजी बाई गंगाबाई येथे तपासणीसाठी आणले असता ती साडे तिन महिन्याची गर्भवती असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.१० साक्षदारांची न्यायालयासमोर नोंदविली साक्षया प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तथा सरकारी अभियोक्ता महेश चांदवानी यांनी एकुण १० साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली.