लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या सोनी येथील ३८ वर्षाच्या महिलेवर बळजबरी करणाऱ्या गावातीलच एका आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (दि.१३) रोजी सुनावली.हेमराज फुलीचंद पटले (३८) रा. सोनी असे आरोपीचे नाव आहे. गावात २२ आॅगस्ट २०१३ रोजी कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने पीडित महिलेचे पती कीर्तन ऐकायला गेले होते. रात्रभर सुरु असलेल्या कीर्तनात लोक दंग असल्याचे पाहून आरोपी हेमराजने पीडित महिलेच्या घरी २३ आॅगस्ट २०१३ च्या पहाटे २.३० वाजता प्रवेश करुन त्याने सदर महिलेचे तोंड दाबून बळजबरी केली. ओरडली तर ठार करीन अशी धमकी दिली. परंतु त्याच्या धमकीला न जुमानता पीडित महिला ओरडली. परंतु लाऊडस्पीकरचा आवाज मोठा असल्यामुळे पीडितेचा आवाज ऐकायला आला नाही. कीर्तनातून तिचे पती घरी परत आले असता हेमराज तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे लक्षात आले. त्याने पकडून त्याला मारहाण केली. शेजारातील सर्व लोक गोळा झाले व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.गोरेगाव पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आरोपीविरूध्द ४४८, ३७६, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल टोपे, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन धुमाळ, कर्मचारी महिला पोलीस हवालदार सुधा गणवीर यांनी केली होती.या प्रकरणावर बुधवारी (दि.१३) रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश-२ माधुरी आनंद यांनी सुनावणी केली. या सुनावणीत आरोपीला कलम ३७६ अंतर्गत १० वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत एक महिन्याची शिक्षा, ५०० रुपये दंड, कलम ५०६ अंतर्गत एक महिन्याची शिक्षा १ हजार रुपये दंड, कलम ४४८ अंतर्गत एक महिन्याची शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला आहे.दंडाची रक्कम ७ हजार रुपये वैकल्पिक वाद निवारण केंद्राने वसूल करुन ती पीडितेला देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात न्यायालयात आठ साक्षदार तपासण्यात आले होते. सरकारी वकील म्हणून माजी सरकारी वकील शबाना अंसारी व प्रकाश तोलानी यांनी काम पाहिले.
बलात्काऱ्याला १० वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:12 PM
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या सोनी येथील ३८ वर्षाच्या महिलेवर बळजबरी करणाऱ्या गावातीलच एका आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाचा सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (दि.१३) रोजी सुनावली.हेमराज फुलीचंद पटले (३८) रा. सोनी असे आरोपीचे नाव आहे. गावात २२ आॅगस्ट २०१३ रोजी कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने पीडित ...
ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : गावातील कीर्तनाच्या गोंगाटाचा घेतला फायदा