लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी धापेवाडा टप्पा-२ मधील तृतीय टप्पा पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रूपयाचा निधी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मंजूर केला.धापेवाडा टप्पा-२ मधील तिसºया टप्यात ३७ हजार ९८६ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सडक-अर्जुनी येथे स्वतंत्र उपविभागही देण्याचे महाजन यांनी मान्य केले आहे. गोंदिया येथे नविन प्रशासकीय इमारत बांधून जलसंपदा विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणले जाणार आहेत.गोंदिया येथे अधीक्षक अभियंता यांचे कार्यालयही सुरू करण्यात येणार आहे. कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या दुसºया टप्प्यातील संपादीत जमिनीचा मोबदला देण्याचाही निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. गोंदिया जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असून येथे निसर्गरम्य वातावरणात सातत्याने पर्यटक येतात.जलसंपदा विभागाची मोडकळीस आलेली विश्रामगृहे व वसाहती नूतनीकरण करून लिजवर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळास दिल्यास या क्षेत्रात पर्यटनाला मोठी चालना मिळेल. मात्र त्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने तसा प्रस्ताव देण्याच्या सूचना सदर बैठकीत देण्यात आल्याचेही पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध पूरक कालवा योजनेचे सहा कोटी रूपये पुर्ननिर्माण योजना करून बांधकामासाठी देण्याचेही मंजूर करण्यात आले.सडक अर्जुनी तालुक्यातील उमरझरी लघु प्रकल्पाचे गाळ काढण्याचे व कालवे दुरूस्तीचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याचेही बडोले यांनी सांगितले.जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जलसंपदाचे प्रधान सचिव चहल, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक सुर्वे, भंडारा पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता सोनटक्के, नागपूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता गवळी, यांत्रिकी विभाग नागपूरचे अधिक्षक अभियंता मडामे आदी अधिकारी उपस्थित होते.गोंदिया जिल्ह्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नासंबधी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात मंगळवारी बैठक घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील सिंचनासंबंधी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. धापेवाडा टप्पा-२ साठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा मंत्री महाजन सांगितले.- राजकुमार बडोले, पालकमंत्री.............................................जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पापैकी एक असलेल्या धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा-२ च्या कामासाठी निधी मंजूर करण्यात यावा. हा प्रकल्प लवकारात लवकर मार्गी लावून शेतकºयांचा सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न लावून धरला होता. त्याला आता यश आले आहे.- विजय रहांगडाले, आमदार तिरोडा.
धापेवाडा टप्पा-२ साठी १०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 10:13 PM
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी धापेवाडा टप्पा-२ मधील तृतीय टप्पा पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रूपयाचा निधी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मंजूर केला.
ठळक मुद्देलोकप्रतिनीधींचा पाठपुरावा : तिसºया टप्प्यात वाढेल ३८ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र