यावेळी सरपंच कीर्ती रहांगडाले, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मोटघरे, डाॅ. रुबी रिनाईत, डाॅ. तुलसी भगत उपस्थित होते.
केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. कृती दल तसेच वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. याअंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. तसेच लसीकरणासंदर्भात यावेळी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. आरोग्यसेविका मेश्राम, लांडगे सिस्टर, बन्सोड सिस्टर, कोरोना तपासक बिसेन, औषध वितरक तुमसरे, केंद्रप्रमुख विलास डोंगरे, उपसरपंच पटले, कमल ठाकरे, लक्ष्मीबाई रहांगडाले, शीला बिसेन, अजय शेंदरे, प्रशांत गौतम यांनी सहकार्य केले.