शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

१०२९ विद्यार्थ्यांना आरटीईतंर्गत मिळणार मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:57 PM

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे.

ठळक मुद्देअर्ज नोंदणीला सुरुवात : परिसरातील १० शाळा निवडण्याची मूभा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायमविना अनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. यातंर्गत जिल्ह्यातील १०२९ विद्यार्थ्यांना आरटीईनुसार २५ टक्के मोफत प्रवेश दिले जाणार आहेत.१० फेब्रुवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता पात्र पाल्यांच्या पालकांनी आॅनलाईन प्रवेश नोंदणी करायची आहे. पालकाला प्रवेश नोंदणी करताना १ किमी., ३ किमी, त्यापेक्षा अधिक अंतरातील फक्त १० शाळा निवडता येतील. प्रत्यक्षात एकच शाळेला प्रवेश मिळणार आहे. निर्धारित कालावधीत पालकाने आपल्या पाल्याचे प्रवेश निश्चित करायचे आहे. पुढच्या फेरीत त्या पाल्याचा विचार केला जाणार नाही. कोणताही सबळ कारणाअभावी शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणाºया शाळेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाल्याचे वय (विद्यार्थ्याचे) कमीत कमी ५ वर्ष ८ महिने पूर्ण असावे, ६ वर्ष ११ महिने २९ दिवस पेक्षा अधिक वय असू नये. पालकांनी विद्यार्थ्याची आॅनलाईन नोंदणी करताना कोणतेही कागदपत्रे अपलोड करु नये, उत्पन्नाच्या दाखल्यामधील बारकोड खालील क्रमांक आनलाईन अर्जामध्ये नमूद करावे. विद्यार्थ्याला आॅनलाईन प्रवेश मिळाल्यानंतर तसा एसएमएस शाळांना व पालकांना पाठविण्याची व्यवस्था आहे. पालकांनी सुरु असलेले संपर्क क्रमांक आॅनलाईन प्रवेश नोंदणी करते वेळी लिहिने आवश्यक राहील. वेबसाईटवर जाऊन पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी करावी. पालकांनी आॅनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी. एखाद्या शाळेतील वंचित व दुर्बल घटकातील बालके उपलब्ध न झाल्यास त्या प्रमाणात २५ टक्के प्रवेशातील जागा रिक्त ठेवणे बंधनकारक राहील. सदर प्रवेश प्रक्रियेदरम्यान संबधित तालुक्याचे गटसाधन केंद्रस्थळी मदत व तक्रार निवारण केंद्र निर्माण केले आहे. अधिक माहितीकरीता त्या ठिकाणी संपर्क साधता येईल.पालकांनो ही कागदपत्रे जोडाजन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (सर्व घटकांना अनिवार्य), सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही), आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याच्या पालकांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला (२०१६-१७ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात येईल), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र, घटस्फोटीत महिला/विधवा महिला यांची बालके, अनाथ बालके व दिव्यांग बालके यांच्या बाबतीत पुढील कागदपत्रे आवश्यक राहतील.