लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देवरी तालुक्याच्या पलानगावची बाघ उपसा जलसिंचन सहकारी संस्था आता अस्तीत्वात नाही. या संस्थेची नोंदणी ३१ मार्च २०१२ ला रद्द करण्यात आली. यानंतरही या संस्थेवर भंडारा येथील भूविकास बँकेचे १० लाख ३६ हजार रुपयांचे कर्ज आहे. आता या संस्थेचे कर्जाची कोण परतफेड करेल असा सवाल उपस्थित होत आहे.या संस्थेला फक्त २७ हजार रूपयाचे कर्ज भूविकास बँकेच्या खात्यात जमा करायचे होते. ही रक्कम सदर संस्था देऊ शकली नाही. यामुळे भूविकास बँकेने व्याजाची आकारणी केली. दंड व त्याचे व्याज असे एकूण १० लाख ३६ हजार रूपये आता भरावे लागतील. जी संस्था २७ हजार भरू शकली नाही. ती संस्थाच बंद पडली. तिच्याकडून १० लाखापेक्षा अधिक रक्कम भरणे होणार का? विशेष म्हणजे कर्ज पलनगावच्या संस्थेला १४ एप्रिल १९७७ ला देण्यात आले होते. कर्ज दिले तेव्हापासून आतापर्यंत ४५ वर्षाचा काळ लोटला. त्या वेळी या संस्थेने १.१२ लाख रूपयाचे कर्ज घेतले होते. परंतु संस्थेवर त्यातील २७ हजार मूळ रक्कम होती. व्याज व दंड मिळवून १०.०९ लाख रूपये झाले होते. मूळ रकमेपेक्षा कितीतरी पटीने व्याज व दंड आकारण्यात आला. आता १०.३६ लाख रूपये या संस्थेवर कर्ज आहे. सदर माहिती सहकारी संस्था गोंदियाचे जिल्हा उपनिबंधक एस.पी. कांबळे यांनी सहकारी संस्था,नागपूरचे विभागीय सहनिबंधक यांना २५ नोव्हेंबर २०१९ रोजी एका पत्राच्या माध्यमातून दिली आहे. या पत्राची प्रत शेतकरी सागर सोनवाने यांना दिली आहे. सहकार क्षेत्रात असा अनागोंदी कारभारही अनेकदा पाहायला मिळते.४५ वर्षापूर्वी ज्या संचालकांनी व सदस्यांनी कर्ज घेतले त्यांच्याकडून वसुलीही करण्यात आली. विना सहकार नाही उद्धार या मूलमंत्राला घेऊन चालत नाही. राजकारणामुळे असे सहकार क्षेत्रातील अनेक संस्था ºहास पावल्या आहेत.२००९ मध्ये अनेक संस्थांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. परंतु या संस्थेला कर्जमाफीचा लाभ देण्यात आला नाही. ४५ वर्षापूर्वी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांची डोकेदुखी झाली आहे.सहा संस्थाची नोंदणी रद्दगोंदिया जिल्ह्यातील ७ जलसिंचन संस्थांवर मागील २० वर्षापेक्षा अधिक वर्षांपासून कर्ज आहे. या संस्थांवर १० कोटी ५२ लाखाचे कर्ज आहे. या सात संस्थांपैकी ६ संस्थांची नोंदणी रद्द झाली आहे. फक्त एकच संस्था कार्यरत आहे. कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता अंतर्गत कलहामुळे अनेक संस्था डबघाईस येतात. परिणामी त्यांना बंद करण्याची पाळी येते.७ जलसिंचन संस्थांवर १०.५२ कोटी कर्जमुंडीकोटा उपसा जलसिंचन सहकारी संस्थेने जिल्हा सहकारी संस्थेवर ३१ मार्च १९९९ मध्ये १३८.१२ लाख कर्ज घेतले होते. या संस्थेवर ११०.५२ रूपये शिल्लक होते. या संस्थेवर ३०४.८२ लाखाचा व्याज लावल्याने ही संस्था ४१५.३४ लाख रूपयाची कर्जदार झाली. सालेकसा तालुक्याच्या गोवारीटोलात भागीरथ पाणी पुरवठा सहकारी संस्थेने ३० मे १९९८ मध्ये ११.१४ लाख रूपयाचे कर्ज जिल्हा बँकेकडून घेतले होते. त्या संस्थेवर ७.९ लाख रूपये मूळ रक्कम होती. २१.०८ लाख रूपये व्याज जोडल्यावर आता या संस्थेवर २८.९८ लाख रूपये कर्ज आहे. ब्राह्मणटोलाच्या अंबिका पाणी पुरवठा सहकारी संस्थेने ३० फेब्रुवारी १९९९ ला जिल्हा बँकेतून ५.८९ लाख रूपयाचे कर्ज घेतले होते. संस्थेवर मूळ ३.९४ लाख रूपये बाकी होते. ११.०२ लाख रूपये व्याज जोडल्यानंतर कर्जाची१४.९६ लाख रूपये झाली आहे. जयलक्ष्मी उपसा जलसिंचन संस्था राकाने जिल्हा बॅकने ५०.६ लाखाचे कर्ज ३० आॅक्टोबर १९९६ घेतले होते. त्यांच्यावर ४९.९४ लाख रूपये मूळ रक्कम बाकी होती. या संस्थेवर १०५.१९ लाख रूपये जोडून १५५.१३ लाख रूपयाचे कर्ज या संस्थेवर आहे. राजीव उपसा जलसिंचन संस्था हरदोलीने २० मार्च १९९७ ला ७९.१४ लाखाचे कर्ज घेतले. या संस्थेवर ७८.७७ लाख रूपये बाकी होते. व्याज न दिल्यामुळे व्याजासह आता २२७.७७ लाखाचे कर्ज आहे. हरीष उपसा जलसिंचन योजना बिरोलीने भंडारा भूविकास बँकेतूने १ एप्रिल २००४ ला ७३.१४ लाख रूपयाचे कर्ज घेतले होते. त्यांच्यावर १८.१२ लाख रूपयाची रक्कम बाकी होती. १८२. १ लाख व्याज लावून आता या संस्थेवर २००.२२ लाखाचे कर्ज आहे.या सातही संस्थावर २६९.४६ लाखाचे कर्ज बाकी होता. परंतु त्यांच्यावर ७७३.२१ लाख व्याज लावल्याने आता १०५२.७६ लाखाचे कर्ज आहे.
२७ हजाराच्या कर्जाचे भरावे लागणार १०.३६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:00 AM
या संस्थेला फक्त २७ हजार रूपयाचे कर्ज भूविकास बँकेच्या खात्यात जमा करायचे होते. ही रक्कम सदर संस्था देऊ शकली नाही. यामुळे भूविकास बँकेने व्याजाची आकारणी केली. दंड व त्याचे व्याज असे एकूण १० लाख ३६ हजार रूपये आता भरावे लागतील. जी संस्था २७ हजार भरू शकली नाही. ती संस्थाच बंद पडली. तिच्याकडून १० लाखापेक्षा अधिक रक्कम भरणे होणार का? विशेष म्हणजे कर्ज पलनगावच्या संस्थेला १४ एप्रिल १९७७ ला देण्यात आले होते.
ठळक मुद्दे४५ वर्षानंतरही कर्जमुक्ती नाही : पलानगाव बाघ उपसा जलसिंचन सहकारी संस्थेची व्यथा