मागील १२ वर्षांपासून गोंदिया व परिसरांतील मुस्लिम समाजबांधवांच्या आर्थिक बाबी लक्षात घेऊन मुस्लिम मायनॉरिटी ट्रस्टने सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू केली. या अखंडित परंपरेत जवळपास ५०० पेक्षा अधिक जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. त्यामुळे या सोहळ्याची प्रतीक्षा प्रत्येक मुस्लिम कुटुंबीयांना असते. यावर्षी कोरोना संसर्ग लक्षात घेऊन शनिवारी नियमांच्या अधीन राहून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ११ जोडपी विवाहबद्ध झाली. आयोजित ट्रस्टच्या वतीने नवदाम्पत्यांना जीवनावश्यक वस्तू, कपडे व मंगळसूत्र भेटवस्तू म्हणून देण्यात आले.
बॉक्स
कोरोनायोद्धा यांचा सत्कार व आरोग्य शिबिर
कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अनेकांनी जीवाची पर्वा न करता सेवा पुरविली. या कोरोना योद्धा यांचा सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त आयोजक ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.