लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धाडसत्र राबविले असून गोंदिया शहर, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा येथे दारू पकडली आहे.शनिवारी (दि.९) पहाटे करण्यात आलेल्या या कारवायांत पथकाने १ लाख ११ हजार २८६ रूपयांची दारू पकडली असून चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. यात, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील एका महिलेच्या घरावर धाड घालून ३८ हजार ४४ रूपये किंमतीची देशी-विदेशी व हातभट्टीची दारू जप्त केली. त्याचप्रकारे अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत मुनेश्वर टिकाराम बरय्या (३५,रा.वडेगाव रेल्वे) याच्या ताब्यातून ११ हजार ७५० रूपये किंमतीची हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत दुचाकीवर जात असलेल्या २ इसमांकडून देशी दारूच्या ५ पेट्यांसह ६१ हजार ४९२ रूपयांचा माल पथकाने जप्त केला.पथकाने असा एकूण १ लाख ११ हजार २८६ रूपयांचा माल जप्त केला असून ४ आरोपींवर संबंधीत पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंद केला आहे.
१.११ लाखांची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 9:58 PM
दारूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धाडसत्र राबविले असून गोंदिया शहर, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा येथे दारू पकडली आहे.
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची धाड : गोंदिया, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा येथील कारवाई