शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

जिल्ह्यात मोहिमेदरम्यान आढळले ११४ कुष्ठरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:32 PM

जिल्हा कुष्ठरोग विभागातर्फे जिल्ह्यात ५ ते २० सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग तपासणी मोहिमेदरम्यान ११४ कुष्ठरुग्ण आढळले.

ठळक मुद्देकुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ : २ हजार ५२५ रुग्ण संशयित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा कुष्ठरोग विभागातर्फे जिल्ह्यात ५ ते २० सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग तपासणी मोहिमेदरम्यान ११४ कुष्ठरुग्ण आढळले. तर २ हजार ५२५ कुष्ठरोगाचे संशयीत रुग्ण आढळले. या रुग्णांच्या सर्व तपासण्या झाल्यावर संशयीत रुग्णांपैकी किती कुष्ठरुग्ण आहेत, असे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कुष्ठरोगाला प्रतिबंध लावण्यासाठी कुष्ठरोग नियंत्रण विभागातर्फे जनजागृती व तपासणी मोहीम राबविली जात आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यातील एकूण १४ लाख ४५ हजार ३९ लोकसंख्येपैकी १२ लाख ६ हजार ९९५ लोकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून ८७ टक्के लोकांपर्यंत पोहोचण्यात या विभागाला यश आले. ही मोहिम राबविण्यासाठी एकूण १ हजार २१ पथक तयार केले होते. मोहिमेत आशा स्वंयसेविकांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता.संशयीत रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यात ५८०, गोरेगाव २६५, आमगाव ३३७, तिरोडा ३७७, सालेकसा १७१, सडक-अर्जुनी २०४, देवरी २५२ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात ३३९ रुग्णांचा समावेश आहे.संशयित आढळलेल्या २ हजार ५२५ कुष्ठरुग्णांपैकी १ हजार ९६९ जणांची तपासणी करण्यात आली. यात ११४ कुष्ठरुग्ण आढळले. गोंदिया तालुका २६, गोरेगाव १५, आमगाव ६, तिरोडा ५, सालेकसा ६, सडक अर्जुनी २२, देवरी ४, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ३० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कुष्ठरुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाºया जनजागृती मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील वर्षी आढळले २०५ रुग्णकुष्ठरोग नियंत्रण विभागातर्फे मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान २ हजार ९९४ संशयीत तर २०५ कुष्ठरुग्ण आढळले होते. त्यानंतर यंदा पुन्हा ११४ कुष्ठरुग्ण आढळल्याने या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे