शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

पिण्याच्या पाण्याचे ११.५८ कोटी बाकी

By admin | Published: May 23, 2017 12:57 AM

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपेक्षा करतात, पण पाण्याचा कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात.

चांगल्या सुविधेसाठी भरपाईची गरज : कधीपर्यंत नुकसानीत चालणार पाणी पुरवठा, १०० कोटींच्या खर्चातून नवीन पाईप लाईनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून शहरातील नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची अपेक्षा करतात, पण पाण्याचा कर भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गोंदिया शहरातील नागरिकांवर पाण्याचे कर आता वाढून ११ कोटी ५८ लाख चार हजार ८०० रूपये झालेला आहे.उल्लेखनिय म्हणजे गोंदिया शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जवळपास १०० कोटी रूपये खर्च करून नवीन पाईप लाईन घातली. तीन नवीन पाणी टाकींचे बांधकाम करण्यात आले. नवीन जलशुद्धीकरण यंत्र लावण्यात आला. एवढेच नव्हे तर पाईप लाईनची जोडणी आपल्या खर्चातून बदलवून दिले जात आहे.तसे पाहता शहरातील पाणी पुरवठा योजना चालविण्याची जबाबदारी नगर परिषदेकडे असायला हवी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने योजना बनवून स्थानिक स्वायत्त संस्थेला हस्तांतरित करण्याचे निर्देश होते. परंतु शासकीय आदेश असतानाही अनेक वर्षांपूर्वी नगर परिषदेने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तेव्हाची विवषता आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गळ्याचा फास बनला आहे. पाणी कराच्या ११ कोटी ५८ लाख चार हजार ८०० रूपयांमधून सर्वाधिक रक्कम घरगुती ग्राहकांवर बाकी आहे. हे बिल मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढतच जात आहे. सन २०१४-१५ मध्ये घरगुती ग्राहकांवर आठ कोटी ७३ लाख सहा हजार ८९१ रूपये बाकी होते. ही रक्कम सन २०१५-१६ मध्ये वाढून नऊ कोटी ४५ लाख ३१ हजार ८९६ रूपये झाली व सन २०१६-१७ मध्ये ही रक्कम १० कोटी तीन लाख ५३ हजार ३०३ रूपयांवर पोहोचली आहे.सद्यस्थितीत गोंदिया शहरात पाणी पुरवठ्याच्या कनेक्शनधाऱ्यांची संख्या एक हजार ३०० आहे. मागील काही वर्षात ही संख्या अधिक जास्त वाढली नाही. नवीन योजना सुरू करण्याच्या पूर्वी कनेक्शन दुप्पट होतील, असा अंदाज लावण्यात आला होता. परंतु नवीन योजना सुरू झाल्यानंतर शंभरापेक्षा अधिक कनेक्शन वाढू शकले नाही. पाणी पुरवठ्याचे बिल न देणाऱ्या ग्राहकांमध्ये घरगुतीच नव्हे तर नगर परिषदेशिवाय विविध संस्था व गैरघरगुती ग्राहकांची संख्यासुद्धा कमी नाही. विविध संस्थांवर ५१ लाख १४ हजार ००१ रूपये, गैरघरगुती ग्राहकांवर ८९ लाख ५६ हजार ६८३ रूपये व नगर परिषदेवर १३ लाख ८० हजार ८१२ रूपयांचा बिल बाकी आहे. जर चांगली सुविधा हवी असेल तर शहरातील नागरिकांना पाण्याच्या कर भरणे आवश्यक आहे.सध्या होत असलेल्या वसुलीतून कर्मचाऱ्यांचे वेतनसुद्धा निघत नाही. शेवटी नुकसानीत कधीपर्यंत ही योजना चालत राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रकारामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा त्रस्त आहेत.एवढा मोठा व्याज केव्हा देणार ग्राहक?जे लोक पिण्याच्या पाण्याचा बिलच देत नाही, ते व्याजाची रक्कम कधी भरणार? असा सवाल विचारला जात आहे. घरगुती ग्राहकांवर सहा कोटी ३४ लाख १३ हजार २९६ रूपये पाणी कराचे लावण्यात आले आहे. पण याच्या व्याजाची रक्कमच तीन कोटी ६९ लाख ४० हजार ००७ रूपये आहे. यात मूळ रकमेत अर्धे व्याजच असल्याचे दिसून येते. संस्थांवर मूळ बिलाची रक्कम ४१ लाख ११ हजार २३२ रूपये आहे तर व्याज १० लाख दोन हजार ७६९ रूपये होत आहे. गैरघरगुती ग्राहकांवर मूळ रक्कम ६५ लाख ३९ हजार ८४५ रूपये बाकी आहे, तर व्याज २४ लाख १६ हजार ८३८ रूपये आहे. नगर परिषदेवर मूळ रक्कम १२ लाख ६८ हजार ४३४ रूपये बाकी आहे तर व्याज एक लाख १४ हजार ३७८ रूपये होत आहे.