वुशू असोसिएशन अध्यक्ष अजय गौर, सचिव सुनील शेंडे, स्पर्धा कार्यकारी अध्यक्ष संजय नागपुरे, प्रदीप मेश्राम, तालुका क्रीडा समिती अध्यक्ष राजेश असाटी, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे, डॉ. संदीप मेश्राम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील ११६ खेळाडूंनी भाग घेतला. यात प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची राज्यस्तरीय अजिंक्यपद वुशू स्पर्धेकरिता निवड करण्यात आली. स्पर्धेत जुरी ऑफ अपील सुनील शेंडे, संजय नागपुरे, सुरेश शहारे, विकेश मेश्राम, खुशाल पिंजारघरे, दीपक घरजारे, माधुरी बडवाईक, अमन नदेश्वर, सेंटर रेफरी ममता गायधने, अंकुश बोहणे, साईड लाईन जज आकाश शहारे, राहुल रहांगडाले, सागर झाडे, प्राची यादव, गौरव बिसेन, अमन बेरीसाल, प्रीत नागपुरे, सुजल नागपुरे यांनी कार्य केले. याप्रसंगी ग्यानिराम भेडारकर, हेमंत चावके, विद्यालाल मानकर, नीलकंठ दोनोडे, अमित मेश्राम यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.
११६ खेळाडूंनी घेतला जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:27 AM