शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

११८८ मामा तलावांची सर्वंकष दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 9:44 PM

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते.

ठळक मुद्दे४०० कामे जूनपर्यंत : ९ हजार हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता गोंडराजाने गोंदिया जिल्ह्यात त्या काळी तयार केलेल्या मामा तलावांची आज दुरवस्था झाली आहे. या तलावांची दुरूस्ती झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढू शकते. यातूनच मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी तीन वर्षात जिल्ह्यातील ११८८ मामा तलावांची सर्वकष दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सर्व तलावांची दुरूस्ती झाली ८९९८ हेक्टर पुनर्स्थापित सिंचन क्षमता वाढून २५ हजार शेतकºयांना सिंचनाचा लाभ होईल.जिल्ह्यातील १४२१ मामा तलावांपैकी ११८८ मामा तलाव स्थिती योग्य नसल्यामुळे या तलावांची सर्वकष दुरूस्ती करण्यासाठी तीन वर्षात विशेष दुरूस्ती करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी सन २०१६-१७ या वर्षात ४१८ तलावांची निवड करण्यात आली. त्या तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने २६ कोटी रूपये जिल्ह्याला दिले आहे. या वर्षातील तलावांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. तर सन २०१७-१८ या वर्षात ३७९ तलावांची निवड करण्यात आली आहे. त्या तलावांपैकी १२३ तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने ९ कोटी ११ लाख रूपये दिले आहेत. या दोन्ही वर्षातील तलावांची संख्या पाहता ४०० तलावांची कामे जून महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहेत. मामा तलावांच्या दुरूस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकºयांची शेती सिंचीत होईल. त्यामुळे आता शेतकºयांच्या शेताला पाणी मिळेल. परिणामी शेतकºयांचे उत्पन्न वाढेल.असा होईल फायदाजिल्ह्यातील ११८८ माल गुजारी तालवांची दुरूस्ती झाल्यास ८ हजार ९९८ हेक्टर सिंचन पुनर्स्थापीत होईल. यामुळे मत्स्य पालनाला वाव मिळेल व पीक क्षेत्र वाढणार आहे. दुरूस्तीपूर्वी ६३७५ हेक्टर मध्ये पीक घेतले जात होते. आता हजारो हेक्टर पीक क्षेत्र वाढणार आहे. मत्स्यव्यवसायात रोजगार उपलब्ध होऊन दरडोई उत्पन्न वाढेल. तलावावरील लोकसहभाग वाढेल परिणामी तलावांना जलवैभव प्राप्त होईल. तलावांसाठी निस्तार हक्क धारक पाणी वापर संस्था स्थापन होतील. सन २०१६-१७ मधील ४१८ कामांतून ३८४३ हेक्टर सिंचन, सन २०१७-१८ मधील ३७९ कामांतून २२६० हेक्टर सिंचन तर सन २०१८-१९ मधील ३९१ कामांतून २८९५ हेक्टर सिंचन होणार आहे.मामा तलावांचे पुनरूज्जीवन कार्यक्रमातून तलावांची सर्वकष दुरूस्ती होत आहे. जून अखेरपर्यंत ४०० तलावांची दुरूस्ती पूर्ण होईल. लवकरच सर्वच तलावांची कामे पूर्ण होतील.गोवर्धन बिसेनउपअभियंता ल.पा. विभाग जि.प.गोंदिया.