लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी गोवर-रूबेला टिकाकरण अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. यात आरोग्य विभागाकडून ८८.२८ टक्के लसीकरण करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवीक ३२.५० टक्केच लसीकरण झाले असल्याचे दिसते. आरोग्य विभागाकडून दैनंदिन उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे दिसत आहे.२७ नोव्हेंबर रोजी पहिल्याच दिवशी ४२ हजार ५३९ मुलांचे लसीकरण करण्यात आले. २८ तारखेला १३ हजार ३६६, २९ तारखेला ३१ हजार ९८६, ३० तारखेला ८ हजार ५३८ तर १ तारखेला २२ हजार ५०३ मुलांचे लसीकरण करण्यात आले. वास्तवीक आरोग्य विभागाला २७ तारखेला ४९ हजार ८७४, २८ तारखेला १४ हजार ९६०, १३ हजार ३६६, २९ तारखेला ३१ हजार ९८६, ३० तारखेला ८ हजार ५३८ तर १ तारखेला २२ हजार ५०३ मुलांना लसीकरण करण्याचे टार्गेट होते. मात्र यातील एकाही दिवशी लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यात आले नाही. या ५ दिवसांत १ लाख ३४ हजार ७१८ मुलांचे लसीकरण करावयाचे असतानाच १ लाख १८ हजार ९३२ मुलांचेच लसीकरण करता आले आहे. म्हणजेच, २७ तारखेला ११.६२ टक्के, २८ तारखेला ३.६५ टक्के, २९ तारखेला ८.७४ टक्के, ३० तारखेला २.३३ टक्के तर १ तारखेला ६.१५ टक्के उद्दिष्टपुर्ती करण्यात आली आहे.याशिवाय, गोंदिया ग्रामीण क्षेत्रात २६ हजार ४९८, तिरोडा ग्रामीण क्षेत्रात १४ हजार ११, गोरेगाव तालुक्यात १० हजार ८६१, आमगाव १३ हजार ५५९, सालेकसा ८ हजार १३२, देवरी ११ हजार ७७२, सडक-अर्जुनी ९ हजार ७१२ व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १२ हजार २१९ मुलांना लसीकरण करण्यात आले आहे. तर गोंदिया शहरात ९ हजार ४३ व तिरोडा शहरात २ हजार ९१५ मुलांना लसीकरण करण्यात आले. यानंतर आतापर्यंत १ लाख १८ हजार ९३२ मुलांना लसीकरण करण्यात आले आहे.वास्तवीक, जिल्ह्याला ३ लाख ६५ हजार ९५८ मुलांना लसीकरण करण्याचे टार्गेट आहे. यात सर्वाधीक ७८ हजार ६१९ मुले गोंदिया ग्रामीण व ४२ हजार ५१३ मुले गोंदिया शहरातील आहेत. तिरोडा ग्रामीण क्षेत्रात ४० हजार ३०८ तर शहरात ७ हजार २१२ मुलांचे टार्गेट आहे. गोरेगाव तालुक्यात ३४ हजार ९०९, आमगाव ३६ हजार ८५६, सालेकसा २४ हजार ५५६, देवरी ३२ हजार १६१, सडक-अर्जुनी ३१ हजार २६२ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३७ हजार ५६२ मुलांचे टिकाकरण करावयाचे आहे.७८ मुलांना लसीकरणातून बाधालसीकरणामुळे जिल्ह्याच ७८ मुलांना बाधा झाली आहे. आरोग्य विभागाकडून याला मायनर, सेवर व सिरीयस अशा तीन गटातून बघितले जाते. यात ७४ मुले मानयर असून सेवरमध्ये १ तर ३ मुले सिरीयस गटात आहेत. रूबेला लसीकरण अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. चांदेवार यांनी, कमजोरीमुळे असे रिएक्शन होत असून घाबरण्याची गरज नसल्याचे सांगीतले.
१.१९ लाख मुलांना रूबेला लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 9:34 PM
जिल्ह्यात २७ नोव्हेंबर रोजी गोवर-रूबेला टिकाकरण अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. यात आरोग्य विभागाकडून ८८.२८ टक्के लसीकरण करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवीक ३२.५० टक्केच लसीकरण झाले असल्याचे दिसते. आरोग्य विभागाकडून दैनंदिन उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देउद्दिष्टपूर्ती नाहीच : फक्त ३२.५० टक्केच लसीकरण