नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यक्तीमत्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्य बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला. तंबाखूमुक्त शाळेचे ११ निकष पूर्ण करून त्याचे पुरावे टोबॅकोे फ्री स्कूल अॅपवर अपलोड करायचे होते. या अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यातून १ ऑगस्ट २०२० पर्यंत टोबॅकोे फ्री स्कूल अॅपच्या तपासणीनंतर त्यापैकी १५६५ शाळा तंबाखूमुक्त शाळा झाल्या आहेत. ११९ शाळा तंबाखुमुक्त झाल्या नाहीत.गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखूमुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखूमुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत सर्व शाळा होत्या.जिल्ह्यातील १५६५ शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून ११९ शाळांना तंबाखूमुक्तीच्या अॅपमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे रिजेक्ट झाल्या आहेत. आमगाव, देवरी व सडक-अर्जुनी तालुक्यातील संपूर्ण शाळा तंबाखुमुक्त झाल्या आहेत. भारतात दररोज दोन हजार ५०० लोकांचा तंबाखूने सेवनाने मृत्यू होतो.वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूने एकट्या भारतात मृत्यूमुखी पडतात. तंबाखूमुळे होणाºया तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधीक रूग्ण भारतात आहेत.तंबाखूमध्ये २८ कर्कजन्य रसायनेइंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे. या तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे.तंबाखू सोडण्यासाठी हे करातंबाखू सोडण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबीय, नातलग किंवा मित्रांसमोर करावी, तंबाखूसाठी प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहावे, तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, धावा किंवा दोरीवरील उड्या घ्याव्या, प्राणायाम, कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थाचे सेवन करावे. तंबाखू सेवनाने शरीरात अस्तीत्वात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना शेअर कराव्यात.बालकदिनी गोंदिया जिल्हा होणार तंबाखूमुक्ततंबाखूमुक्त शाळेचे ११ निकष पूर्ण करून ११९ शाळा १४ नोव्हेंबर रोजी बालकदिनी गोंदिया जिल्हा तंबाखुमुक्त शाळा असलेला जिल्हा म्हणून पुढे येणार असल्याचा संकल्प गोंदिया शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांची चर्चा होत आहेत. आतापर्यंत तंबाखुमुक्त न झालेल्यांमध्ये अर्जुनी मोरगाव २१ शाळा, गोंदिया तालुक्यातील ६२ शाळा, गोरेगाव तालुक्यातील १६ शाळा, सालेकसा तालुक्यातील १३ शाळा तर तिरोडा तालुक्यातील ७ शाळांचा समावेश आहे.
तंबाखूमुक्तीत जिल्ह्यातील ११९ शाळा नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 5:00 AM
इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे.
ठळक मुद्देआमगाव, देवरी व सडक-अर्जुनी शंभरटक्के तंबाखूमुक्त : पाच तालुक्यातील माहिती रिजेक्ट