शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

१२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले.

ठळक मुद्देआतापर्यंत १७ जणांचे नमुने निगेटिव्ह : ५७४ व्यक्ती निगरानीत, पालावरील नागरिकांचे सर्वेक्षण केले सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात परदेशातून व बाहेर राज्यातून येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यात २२२ प्रवाशी विदेशातून जिल्ह्यात आले होते. तर त्यांच्या संपर्कात एकूण ९४५ व्यक्ती आढळून आल्या होता. यापैकी १२२ प्रवाशांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी मंगळवारी (दि.३१) संपला. त्यामुळे आता १०० विदेशी प्रवाशी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या ४७४ जण अशा एकूण ५७४ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्या प्रशासनाच्या देखरेखखाली आहेत.जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शहरातील गणेशनगर येथे आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील पाच सदस्य आणि चार मित्रांचे नमूने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यासर्वांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला असून या सर्वांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नमुने निगेटीव्ह आढळले. तर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण १८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १७ नमुने निगेटीव्ह तर केवळ १ जणांचा नमुना पाझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण विदेशातून २२२ प्रवाशी आले तर त्यांच्या संपर्कात ९४५ जण आले होते. मात्र यापैकी १२२ प्रवाशांचा विलगीकरणाचा कालावधी ३१ मार्च रोजी संपला.त्यामुळे आता केवळ १०० विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेले ४७४ अशा एकूण ५७४ जणांंना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर प्रशासनाची नजर आहे. विशेष मागील पाच दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण अथवा संशयीत रुग्ण आढळून आला आहे. मात्र प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे.केटीएसमध्ये शंभर खाटांचे कक्ष सज्जराज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. मंगळवारी हा आकडा ३०२ वर पोहचला.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात शंभर खाटांचे विशेष कक्षाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.इतर राज्य व जिल्ह्यातून परतले ९ हजार नागरिककोरोनामुळे देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग धंदे बंद पडल्याने रोजगारासाठी इतर जिल्ह्यात व राज्यात गेलेले मजूर व कामगार आपल्या जिल्ह्यात परतत आहे. ३१ मार्चपर्यंत एकूण ९०१३ जण आलेले आहेत. तर विदेशातून २२२ जण परतले आहे. या सर्वांवर प्रशासनाने नजर ठेवली आहे.पोलिसांनी उचलली कठोर पाऊलेलॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र यानंतरही नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सुध्दा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला असून त्यांना आता प्रसाद देण्यास सुरूवात केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस