लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्गंत सालेकसा येथील एका सहकारी संस्थेने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापेक्षा प्रत्यक्षात गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गोदामात नेमके किती धान कमी अथवा बरोबर याची चौकशी करण्यासाठी धानाचे वजन केले जात आहे. संस्थेच्या गोदामात सोमवारी (दि.२७) सायंकाळपर्यंत १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल करण्यात आल्याची माहिती आहे.सालेकसा येथील एका सहकारी संस्थेने खरीप हंगामात १ लाख ४० हजार क्विंटल धानाची खरेदी केली होती. यापैकी ६९ हजार क्विंटल धानाची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आदेशानुसार राईस मिलर्सनी उचल केली. त्यामुळे खरेदी केलेल्या धानानुसार संस्थेच्या गोदामात ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात संस्थेच्या गोदामात खरेदी केलेल्या धानापेक्षा ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी याची गांर्भियाने दखल घेत संस्थेच्या गोदामाला सील ठोकण्याचे आदेश दिले. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक कोक आणि भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी गणेश खर्चे यांची चौकशी समिती नेमली.या समितीने सुरूवातीला धान खरेदीच्या कागदपत्रांची चौकशी केली. मात्र केवळ कागदपत्रांच्या आधारावर गोदामात नेमके किती धान कमी आहे हे सांगता येणे अवघड आहे.त्यामुळे गोदामातील धानाची उचल करुनच धान कमी अथवा बरोबर आहे सांगता येणे शक्य असल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी व मार्केटिंग फेडरेशनकडे सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धानाचे वजन करण्यासाठी गोदामातून धानाची उचल करण्याचे आदेश दिले.त्यानंतर गोदामातील धानाची उचल करण्यास सुरूवात झाली. सालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामातून आत्तापर्यंत एकूण १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल करण्यात आली असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.धानाची उचल करण्यास पुन्हा १५ दिवससालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामात स्टॉक बुक नुसार ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक आहे.आत्तापर्यंत १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल करण्यात आली आहे. हे धान जवळपास ५ हजार क्विंटलवर असण्याची शक्यता आहे.त्यामुळे पूर्ण धानाची उचल करुन वजन करण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.अहवाल येण्यास महिना लागणारसहकारी संस्थेच्या गोदामातील संपूर्ण धानाचे वजन करुन त्याचा अंतीम चौकशी अहवाल येण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र या चौकशीवर सुध्दा काही जणांनी आपेक्ष घेतला असून मंत्रालयात तक्रार केल्याची माहिती आहे.
गोदामातून १३ हजार ६४० कट्टे धानाची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:07 PM
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतर्गंत सालेकसा येथील एका सहकारी संस्थेने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानापेक्षा प्रत्यक्षात गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले.
ठळक मुद्देधान खरेदीतील घोळ प्रकरण : चौकशी अहवालाकडे लक्ष