नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये बांधताना आता जिल्हा ओडीएफ प्लस करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात विना अनुदानाने १५ नोव्हेंबर पर्यंत १३ हजार १७४ शौचालयांची दुरूस्ती व नवी बांधकामे करण्यात आली आहेत. उर्वरित शौचालयांचे बांधकाम किंवा दुरूस्ती ३१ मार्च पूर्वी करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केला आहे.जिल्हा निर्मल करण्याच्या नादात फक्त कागदावर शौचालयाचे काम झाले होते. जिल्हा पाच-सात वर्षा पूर्वी उघड्यावर शौच करण्यापासून मुक्ती (ओडीएफ) झाला होता. सन २०१२ च्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ४५ हजार ५४९ शौचालयाची दुरूस्ती करणे गरजेचेच होते.यातील १३ हजार १७४ शौचालयांची दुरूस्ती किंवा बांधकाम १५ नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले. यात आमगाव तालुक्यातील १४६१, अर्जुनी-मोरगाव ११०५, देवरी १३६९, गोंदिया १६८६, गोरेगाव १३९६, सडक-अर्जुनी १४६६, सालेकसा २०३७ व तिरोडा येथील २६५४ शौचालयांचा समावेश आहे.शौचालयांचे सर्वेक्षण केले त्यात लाभार्थ्यांच्या यादीत १००४ लोकांचे दोन वेळा नाव असल्याचे लक्षात आले. यातील काही लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक घर सोडून बाहेरगावी राहात असल्याचे लक्षात आले. अशा कुटुंबाना शौचालयाचा लाभ दिला जाणार नाही.यामुळे आतापर्यंत ३१ हजार ३७३ कुटुंबाना शौचालयांची दुरूस्ती व नवीन शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कुटुंबाकडे ३१ मार्च पर्यंत शौचालय असण्याचे नियोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत वापरात नसलेल्या शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत वापरात नसलेल्या शौचालयांचे काम करण्यात येणार आहे. जनजागृतीतून पहिल्यांदाच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात शौचालयांची बांधकामे करण्यात आली.मदत न घेता २५१५४ कटुंब शौचालय बनविणारजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात शौचालयाचे महत्व सांगत शौचालय तयार करण्याचा एकसुत्री अभियान जिल्हा परिषदेकडून चालविला जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात गावागावात जाऊन जनजागृती करीत आहेत. प्रेत्येक गावातील घराघरात जाऊन शौचालयासाठी प्रवृत्त करीत आहेत. जनजागृती व गृहभेट अभियानाच्या माध्यमातून २५ हजार १५४ शौचालयाची दुरूस्ती करण्याचे नियोजन पाणी पुरवठा विभाग व स्वच्छता विभागाने केला आहे. स्वच्छ भारत अभियानाला निधी दिला नसतांना फक्त जनजागृतीच्या आधारावर १३ हजार १७४ शौचालयाचे बांधकाम करण्यात आले.गुडमॉर्निंग पथक दररोज गावातग्रामीण क्षेत्रातील लोक शौचालय तयार करण्यासाठी आता स्वत: पुढे येत आहेत. जनजागृतीसाठी दररोज सकाळी ५ वाजता गुडमॉर्निंग पथक गावात पोहचत आहे. स्वत: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती बीडीओ, ग्रामसेवक, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी व लोकप्रतिनिधि गावागावात जाऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगत आहेत. या अभियानातून गावातील महिला-पुरुषांमध्ये जनजागृती दिसून येत आहे. तरूण, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी या अभियानाला सहकार्य करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतादूत गुडमॉर्निंग पथकाला सहकार्य करीत आहेत.
अनुदान न घेता बांधली १३१७४ शौचालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 9:43 PM
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालये बांधताना आता जिल्हा ओडीएफ प्लस करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यात विना अनुदानाने १५ नोव्हेंबर पर्यंत १३ हजार १७४ शौचालयांची दुरूस्ती व नवी बांधकामे करण्यात आली आहेत.
ठळक मुद्दे३१३७३ शौचालयांचे टार्गेेट: मार्च २०१८ अखेर जिल्हा ओडीएफ प्लस