देवरी : पोलिसांनी १६ जानेवारी रोजी गोंदियाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीच्या आधारे देवरीपासून काही अंतरावर उभा असलेल्या ट्रकमधून (क्र. सीजी ०४ एलआर २२२१) एका पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक पोतडीमध्ये तपकिरी रंगाचे आठ पुडके होते. तेथे १६ किलो ५३० ग्रॅम वजनाचा गांजा किंमत एक लाख ३२ हजार २४० रुपये जप्त करण्यात आला.
ट्रक हा देवरी येथील सम्राट बारचे समोरील जिल्हा परिषदेच्या मैदानात उभा होता. या ट्रकची क्रमांकाची पाहणी पोलिसांनी केली असता त्यात गांजा आढळला. गांजासह ट्रक जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत १५ लाख असा एकूण १६ लाख ३२ हजार २४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या संदर्भात देवरी पोलिसांनी कलम २३ (बी) , २१, २२ एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या ट्रकचा चालक फरार झाला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम यांनी केली.