शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

138 जि.प. शाळांना जिवंत विद्युत तारांचा स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 5:00 AM

जिल्हा परिषदेंर्गत चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३८ शाळा इमारतीवरून विजेच्या जिवंत तारा गेल्या असून, अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली, तर मोठा अपघात होऊ शकतो, म्हणून इमारतीवरील तारा काढण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १० ऑगस्ट २०१७ ला ठराव करून पाठपुरावा सुरू केला होता.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिपच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुले शिकत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १०३९ पैकी तब्बल १३८ शाळांच्या परिसरातून जिवंत विद्युत तारा गेल्या आहेत. वादळ, वाऱ्यामुळे किंवा जीर्ण झालेल्या जिवंत वाहिन्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याचा धोका होता. हे चिमुकल्यांवरील संकट दूर करण्यासाठी जिल्हा परिषद अद्यापही तयार नाही. या जिप शाळांवरील विद्युत वाहिन्या हटविण्यासाठी  विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत.जिल्हा परिषदेंर्गत चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३८ शाळा इमारतीवरून विजेच्या जिवंत तारा गेल्या असून, अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली, तर मोठा अपघात होऊ शकतो, म्हणून इमारतीवरील तारा काढण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने १० ऑगस्ट २०१७ ला ठराव करून पाठपुरावा सुरू केला होता. विद्युत विभागाने सर्वेक्षण करून येणाऱ्या खर्चाचे आराखडे तयार केले होते; परंतु निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्न तसाच पडून होता. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १३८ शाळांच्या इमारतींवरून विजेच्या वाहिन्या  गेल्या आहेत. या कामासाठी लागणारे ६ कोटी ५० लाख रुपये पूर्व विदर्भासाठी असलेल्या निधीमधून तातडीने खर्च करण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते; परंतु ते निर्देश हवेतच विरले.

तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक शाळांवर वाहिन्या- चिमुकल्या विद्यार्थ्यांवर संकट ओढवणाऱ्या जिवंत विद्युत वाहिन्या व ट्रान्सफाॅर्मरची चौकशी केली असता तिरोडा तालुक्यातील ३७ शाळांच्या आवारातून या वाहिन्या गेल्या आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २६ शाळा, आमगाव २२ शाळा, सडक-अर्जुनी २० शाळा, सालेकसा १३ शाळा,  गोंदिया ११ शाळा, देवरी ६ शाळा, तर गोरेगाव तालुक्यातील ३ शाळा, अशा एकूण १३८ शाळांचा समावेश आहे.

शाळांवरून गेलेल्या जिवंत विद्युत तारांच्या मुद्याकडे आपण अनेकदा शासनाचे लक्ष वेधले. नुकत्याच पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीतसुद्धा या मुद्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. -गंगाधर परशुमकार, माजी जिप सदस्य

 

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज