शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

पावसाअभावी १४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र पडीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:37 PM

जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : आतापर्यंत ७६.८८ टक्के रोवणी

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील महिन्यात धो-धो बरसलेल्या पावसाने मागील २० दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यापैकी खरीप हंगामात १ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरमध्ये धान लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले होते. मात्र पावसाअभावी यंदा १ लाख ७७ हजार ०९४ हेक्टर क्षेत्रामध्येच धानाची रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाने शासनाने पाठविलेल्या अहवालात वर्तवीली आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर जमीन पडीक राहण्याची शक्यता आहे.यावर्षी जिल्ह्यात १५ ते १७ जुलैदरम्यान दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरीबांधव सुखावले होते. रोवणीच्या कामाला सुद्धा वेग आला होता. मात्र तेव्हापासून पावसाने पाठ फिरविल्याने केलेली रोवणी संकटात आली आहे. तर काही शेतकºयांची रोवणी खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमध्येच रोवणी झाली. रोवणीची ही टक्केवारी ७६.८८ आहे. जिल्ह्यातील २३.१२ टक्के क्षेत्रातील रोवणी पावसाअभावी खोळंबल्याचे चित्र आहे.१ लाख ९१ हजार ७१३ हेक्टरऐवजी एक लाख ७७ हजार ०९४ हेक्टरमध्येच रोवणी होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे १४ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र पडीक राहण्याची शक्यता आहे.तर परिस्थिती गंभीरपावसाअभावी मागील काही दिवसांपासून उष्णतामान वाढले आहे. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. ज्या शेतकºयांची रोवणी झाली त्यांना सुध्दा पावसाची गरज आहे. तर पावसाअभावी २३ टक्के रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात झालेली रोवणीजिल्ह्यातील १ लाख ३६ हजार १४९.२७ हेक्टरमधील रोवणीपैकी धानाची नर्सरी १८०२०.१९ हेक्टर क्षेत्रात लावण्यात आली. प्रत्यक्षात रोवणी एक लाख २८ हजार ४१३.२९ हेक्टरमध्ये झाली. तर आवत्या ७७३३.९८ हेक्टरमध्ये लावण्यात आला आहे. तालुकास्तरावर गोंदिया तालुक्यात २६ हजार ३५६.९२ हेक्टर, गोरेगावात १५ हजार ५३० हेक्टर, तिरोडा येथे १७ हजार ७०८.६० हेक्टर, सडक-अर्जुनी येथे १५ हजार २४० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव येथे १९ हजार १४९, आमगावात १४ हजार ३५४.९५ हेक्टर, सालेकसा येथे १० हजार ३८५.८० हेक्टर व देवरी येथे १४ हजार ४२४ हेक्टरमध्ये रोवणी आटोपली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्तसध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकºयांना विविध कामांसाठी कृषी विभागाशी संबंध येतो. मात्र गोंदिया येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. रोवणी आणि दुष्काळी परिस्थितीचे अहवाल पाठविण्यास सुध्दा विलंब होत असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची बदली अमरावती येथे झाली असून ते तेथे रुजू सुद्धा झाले आहेत. मात्र नगरहून गोंदियाला बदली झालेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अद्यापही गोंदियाच्या कार्यालयात रुजू झाले नाहीत. ते १० ते १२ तारखेच्या नंतर रुजू होणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी