लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया वनविभागांतर्गत गोंदिया वनपरिक्षेत्रातील, मुंडीपार सहायक वनक्षेत्रातील चुटिया नियत क्षेत्रात येत असलेल्या लोधीटोला येथे १५ नोव्हेंबर रोजी एका पट्टेदार वाघाची शिकार झाल्याचे उघडकीस आले. या संदर्भात १६ नोव्हेंबर गोंदिया वनिवभागाने वन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु वाघाचे बहुतांश अवयव अजूनही गायब आहेत. त्या अवयवांचा शोध गोंदिया वनविभाग घेत असल्याची माहिती सहाय्यक उपवन संरक्षक राजेंद्र सदगीर यांनी दिली. पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली. १६ नोव्हेंबरपासून वन कर्मचाऱ्यांनी गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगांव- नागझिरा व्याघ्र राखीय क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले. मृत वाघाचे अवशेष आढळलेल्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना व इतर संशयीत इसमाना चौकशी करीता उपवनसंरक्षक कार्यालय गोंदिया येथे बोलविण्यात आले. चौकशीत रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले रा.लोधीटोला, बालचंद सोनू राणे रा. चुटिया, छेदीलाल पटले (४५) रा. इंदिरानगर पिंडकेपार व बाबा शरणागत (५५) रा. चुटीया यांनी करंट लावून वाघाची शिकार केल्याचे तपासात आढळुन आले. त्या पाचही जणांना अटक करण्यात आली. आधी तिघांना २५ नोव्हेंबर रोजी तर दोघांना २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने वनकोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी देऊन जामीन मंजूर झाला आहे. या घटनेत वाघाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली. परंतु वाघाचे १४ नखे, ४ दात व वाघाचा जबडा अजूनही वनविभागाला मिळाला नाही. याचाच अर्थ या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असावा असा कयास लावून वनविभाग तपास करीत आहे.
वाघाचे १४ नखे, ४ दात व जबडाही मिळाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:00 AM
पट्टेदार वाघाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकाऱ्यांनी तपासाला सुरूवात केली. १६ नोव्हेंबरपासून वन कर्मचाऱ्यांनी गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगांव- नागझिरा व्याघ्र राखीय क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले. मृत वाघाचे अवशेष आढळलेल्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना व इतर संशयीत इसमाना चौकशी करीता उपवनसंरक्षक कार्यालय गोंदिया येथे बोलविण्यात आले.
ठळक मुद्देलोधीटोला वाघ शिकारीचा तपास अपूर्णच : वनाधिकारी घेताहेत शोध