शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

१४१ विहिरींचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:21 PM

गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देतालुक्यात २५० मंजूर विहिरी : ४३ टक्के विहिरींचे काम पूर्ण

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा :गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यासह पूर्वी विदर्भात मागेल त्याला विहीर योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत पूर्वी विदर्भात एकूण ११ हजार सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेची सुरुवात डिसेंबर २०१६ मध्ये झाली असून दीड वर्ष लोटूनही निम्यापेक्षा जास्त विहिरींचे काम अर्धवट आहे. येत्या खरीप हंगामापूर्वी सर्व विहिरींचे काम पूर्ण होण्याचा दावा संंबंधित विभाग करीत असला तरी ज्या वेगाने काम चालत आहे त्यानुसार सर्व विहिरी यंदा पूर्ण होतील की नाही, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागातर्फे सदर सिंचन विहिरींचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील खरीप हंगामापूर्वी काही मोजक्या विहिरींचे काम पूर्ण झाले होते. बाकीच्या विहिरींचे काम यंदा सुरु करण्यात आले आहेत. २५० पैकी आतापर्यंत फक्त १०९ विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. तर १४१ विहिरींचे काम सुरू असून त्यापैकी २४ विहिरींचे काम ९० टक्क्यांवर पोहोचले आहे.एकूण २५० विहिरींच्या कामाची देखरेख तीन अभियंत्यांकडे आहे. शाखा अभियंता यु.एम. इसळ यांच्याकडे १३४, एस.एम. मेश्राम ४६ आणि डी.एम. गायधने यांच्याकडे ६९ विहिरींचे काम देण्यात आले आहे. यापैकी इसळ यांच्याकडील ६५, मेश्राम यांच्याकडील २० विहिरी आणि गायधने यांच्याकडील २४ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे.यात १०४ विहिरींमध्ये बोअरवेल खोदण्यात आले असून अशा १०३ विहिरींमध्ये पुरेसा पाणी लागलेला आहे. ज्या १४१ विहिरींचे काम होणे बाकी आहे, त्यात २५ टक्के काम पूर्ण झालेल्या २४ विहिरी, ५० टक्के काम पूर्ण झालेल्या ६४ विहिरी, ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या ३२ विहिरी आणि ९० टक्के काम पूर्ण झालेल्या एकूण २४ विहिरी आहेत. शाखा अभियंता यु.एम. इसळ यांच्या देखरेखीतील १३४ पैकी ६५ विहिरींचे काम पूर्ण झाले. ७४ विहिरींचे काम अपूर्ण आहे. एस.एम. मेश्राम यांच्याकडील ४६ विहिरींपैकी २० विहिरी पूर्ण झाल्या असून २७ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे. तर डी.एम. गायधने यांच्याकडील ६९ विहिरींपैकी २४ विहिरींचे काम पूर्ण झाले असून ४५ विहिरींचे बांधकाम अपूर्ण आहे.एकूण विहिरींसाठी सहा कोटींचा खर्चसालेकसा तालुक्याला जिल्ह्यातील दोन हजार मंजूर विहिरींपैकी २५० विहिरी मंजूर करण्यात आल्या. यासाठी एकूण सहा कोटी २५ हजारांचा निधी आवश्यक आहे. परंतु आतापर्यंत तीन कोटी ७७ लाख ५० हजार रुपये एवढा निधी तालुक्याला प्राप्त झाला आहे. त्यापैकी तीन कोटी ७७ लाख १० हजार रुपये विहिरींच्या लाभार्थ्यांना टप्याटप्याने देण्यात आले. आतापर्यंत एकूण २१९ लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला. फक्त ४० हजारांचा निधी शिल्लक आहे. उर्वरित निधी लवकर मिळावा व लाभार्थ्यांच्या विहिरींचे काम वेळेवर पूर्ण होऊन त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी आहे.शेकडो शेतकरी प्रतीक्षा यादीतमागेल त्याला विहीर योजनेंतर्गत शेतकºयांना सिंचनाची सोय म्हणून शासनाने बोअरवेलसह विहीर बनविण्याचे अनुदान शंभर टक्के देण्याची योजना राबविली. यानुसार सालेकसा तालुक्यात जवळपास ४०० च्या वर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज केले होते. तर काही इच्छुक शेतकरी विहीत वेळेत अर्ज करायला मुकले. परंतु शासनाने तालुक्याला फक्त २५० विहिरीच मंजूर केल्यामुळे शेकडोंच्या संख्येने शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. तर तालुक्याला विहिरींचा कोटा वाढविण्यात यावा व गरजू आणि वरथेंबी पावसावर अवलंबित शेतकºयांना विहीर बोअरवेलचा लाभ मिळावा, अशी मागणी सर्वसामान्य शेतकरीवर्ग करीत आहे.