शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

१४२२ शेतकरी झाले बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:00 AM

शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्माननिधी देण्यासाठी ग्रामसेवकांसह शेतकऱ्यांसाठी योजना राबविणारा कृषी विभागही कामाला लागला आहे.यात गोंदिया तालुक्यातील ७ हजार ६०८, तिरोडा ३ हजार ६०७, आमगाव ३ हजार ६०५, सालेकसा ३ हजार ६७७, देवरी ३ हजार ३६२, गोरेगाव ३ हजार ३९०, सडक अर्जुनी ३ हजार २८४, अर्जुनी मोरगाव ३ हजार २३६ असे एकूण ३१ हजार ७६९ शेतकरी या योजनेपासून वंचित होते.

ठळक मुद्दे३१७६९ शेतकऱ्यांचे आधार अपडेट। पंतप्रधान शेतकरी सन्मानापासून मुकणार?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३३ हजार १९१ शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप देण्यात आला नाही. त्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड ऑनलाईन अपडेट नसल्यामुळे त्यांची माहिती त्या पोर्टलवर अपलोड होऊन लिंक झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधी मिळाला नाही. १८ ते २३ जानेवारी या काळात जिल्हा परिषदेच्या कृषी व ग्रामपंचायत विभागाने मेहनत घेऊन ३१ हजार ७६९ शेतकºयांचे आधारकार्ड अपडेट केले. परंतु १ हजार ४२२ शेतकऱ्यांची माहिती ग्रामपंचायतींना मिळू शकली नाही.पंतप्रधान सन्मान निधी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन अपडेट केली जाते. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड जोडले. परंतु अनेक शेतकऱ्यांचे आधारकार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेता आला नाही. परिणामी जिल्ह्यातील ३३ हजार १९१ शेतकऱ्यांना सन्मान निधी देण्यासाठी शासन तत्पर असल्याचे दाखवित शेतकऱ्यांचे आधारकार्ड त्वरीत अपडेट करा, अशी सूचना ग्रामपंचायतींना देऊन ग्रामसेवकांना ही कामे प्राधान्याने करण्याचे आदेश देण्यात आले होते. गोंदिया तालुक्यातील ६५ शेतकरी, तिरोडा ११४, आमगाव ४२, सालेकसा ३५८, देवरी ३५५, गोरेगाव २३८, सडक-अर्जुनी ४१, अर्जुनी-मोरगाव २०९ व जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२२ शेतकरी अद्याप ग्रामपंचायतींना सापडले नाहीत.३१७६९ शेतकºयांचे आधारकार्ड अपटेडशेतकऱ्यांना पंतप्रधान सन्माननिधी देण्यासाठी ग्रामसेवकांसह शेतकऱ्यांसाठी योजना राबविणारा कृषी विभागही कामाला लागला आहे.यात गोंदिया तालुक्यातील ७ हजार ६०८, तिरोडा ३ हजार ६०७, आमगाव ३ हजार ६०५, सालेकसा ३ हजार ६७७, देवरी ३ हजार ३६२, गोरेगाव ३ हजार ३९०, सडक अर्जुनी ३ हजार २८४, अर्जुनी मोरगाव ३ हजार २३६ असे एकूण ३१ हजार ७६९ शेतकरी या योजनेपासून वंचित होते. शासनाने त्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी आग्रह धरल्याने १८ ते २३ जानेवारी दरम्यान संपूर्ण शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांचे आधारकार्ड अपटेड करण्याच्या कामात व्यस्त आहे. जिल्ह्यातील एकही शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु १४२२ शेतकरी अद्यापही सापडले नाहीत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी