शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गोंदियाच्या ग्रामीण भागात होणार १.४५ कोटींचे रस्ते

By admin | Published: August 27, 2014 11:41 PM

गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात नागरिकांच्या मागणीवरून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १५ रस्त्यांच्या डांबरीकरण कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात नागरिकांच्या मागणीवरून जिल्हा नियोजन समितीअंतर्गत १५ रस्त्यांच्या डांबरीकरण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यांची किंमत १ कोटी ४५ लाख आहे. आ.गोपालदास अग्रवाल यांनी याबाबतची मागणी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.या रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी गोंदिया विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी आ.अग्रवाल यांच्याकडे वेळोवेळी केली होती. त्यानुसार त्यांनी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देऊन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याचा पाठपुरावा केला होता. नियोजन विभागाने २२ आॅगस्ट २०१४ रोजी याबाबतची मंजुरी दिली आहे. या रस्त्यांमध्ये रापेवाडा-गोदेखारी मार्ग, छोटा गोंदिया-भीमघाट-चुलोद मार्ग, राणी अवंतीबाई चौक-कटंगी रेल्वे क्रॉसिंग मार्ग, रतनारा-हरसिंगटोला मार्ग, तेढवा-मरारटोला-पुजारीटोला मार्ग, नागरा-गोवारीटोला मार्ग, कोचेवाही-बनाथर मार्ग, गोंदिया-बालाघाट राज्य मार्ग ते मोहरानटोली मार्ग, गोंदिया-बालाघाट राज्य मार्ग ते हलबीटोला-सावरी मार्ग, लोधीटोला-गर्रा घिवारी मार्ग, बलमाटोला-रायपूर मार्ग, हलबीटोला (खमारी)-तांडा मार्ग तसेच दासगाव-डांगोरली मार्गावर सीडीचे काम तसेच रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर या कामांना सुरूवात होणार असल्याचे आ.अग्रवाल यांनी कळविले.गोंदिया तालुक्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंजूर केलेल्या विशेष निधीअंतर्गत ४ कोटी रुपयांच्या निधीतून विविध जोडरस्त्यांची कामे तसेच ६ कोटीतून गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांच्या आवश्यकतेनुसार या रस्त्यांना मंजूरी मिळवून दिल्याबद्दल अग्रवाल यांचे अनेकांनी आभार मानले.