.................
जिल्ह्यातील ९०० कोरोना योद्ध्यांनी अद्याप एक डोस घेतला नाही
- मागील वर्षीपासून डॉक्टर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. यापैकी ९०० कोरोना योद्ध्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे.
- आतापर्यंत २८ हजार कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे, तर १४,२०० कोरोना योद्धे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
- लसीकरणादरम्यान कोरोना योद्ध्यांना प्राधान्य दिले जात आहे.
..............
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण : १ लाख ८३ हजार
आरोग कर्मचारी : पहिला डोस ९,७५८, दुसरा डोस ५,५५९
फ्रंटलाइन वर्कर्स : पहिला डोस १९,८५४, दुसरा डोस ९,६८३
१८ ते ४४ वयोगट : पहिला डोस ४,४१६
४५ ते ६० वयोगट : पहिला डोस : ५७,३११, दुसरा डोस १०,१८७
६० वर्षांवरील : पहिला डोस ५४,८८२, दुसरा डोस ११,०९९