शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जिल्ह्यातील १६०१ पैकी १५६५ शाळा झाल्या तंबाखू मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील १६०१ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व शाळा आहेत. जिल्ह्यातील १६०१ शाळांपैकी १५६५ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ३६ शाळांना तंबाखू मुक्तीचा ध्यास आहे.

ठळक मुद्देआता नजर ३६ शाळांकडे : आमगाव व देवरी तालुका झाले शंभरटक्के तंबाखू मुक्त

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यक्तीमत्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. यांतर्गत, गोंदिया जिल्ह्यातील १६०१ पैकी १५६५ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.जिल्ह्यातील १६०१ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व शाळा आहेत. जिल्ह्यातील १६०१ शाळांपैकी १५६५ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ३६ शाळांना तंबाखू मुक्तीचा ध्यास आहे. आमगाव तालुक्यातील १५० शाळा, देवरी तालुक्यातील २०७ शाळा, सडक-अर्जुनी तालुक्यातील १६३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १ शाळा तंबाखुमुक्त व्हायची आहे. तिरोडा तालुक्यातील १९९ शाळांपैकी १९३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ३ शाळांना, सालेकसा तालुक्यातील १४६ शाळांपैकी १४४ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून २ शाळांना, गोरेगाव तालुक्यातील १५५ शाळांपैकी १५० शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ५ शाळांना, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १९७ शाळांपैकी १९३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून ४ शाळांना तंबाखू मुक्तीची प्रतिक्षा आहे.दरवर्षी जगात सुमारे ६४ लाख लोक तंबाखू मुळे मरण पावतात. सन २०३० पर्यंत जगात तंबाखूने मरणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार असल्याचा अंदाज आहे. भारतात दररोज दोन हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यू होतो. वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूने एकट्या भारतात मरण पावतात. तंबाखू मुळे होणाºया तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधीक रूग्ण भारतात आहेत. इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे.तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागले आहे.तंबाखूमुळे होणारे दुष्परिणामतंबाखू सेवनामुळे अनेक दुष्परिणाम होतात. यात, केसांना दुर्गंध येते, तोंडातून दुर्गंध येते, दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात व त्यांची मजबूती नष्ट होते, दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात, वास घेण्याची क्षमता कमी होते, चेहºयावर सुरकुत्या पडतात, शरीरात अशक्तपणा जाणवतो व हाडे ठिसूळ होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते, डोळ्यांमध्ये जळजळ होत पाणी येते. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो, विचार करण्याची क्षमता कमी होते, चित्त एकाग्र करणे कठिण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलीका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरिन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह व मोतीबिंदू होते. पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरूष नपुंसक बनतो. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.तंबाखू सोडण्यासाठी हे करातंबाखू सोडण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबिय, नातलग किंवा मित्रांसमोर करावी. तंबाखूसाठी प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहावे. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, दौड किंवा दोरीवरील उड्या घ्याव्या, प्राणायाम, कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थांचे सेवन करावे. तंबाखू सेवनाने शरीरात अस्तीत्वात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्यावे. तसेच योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना शेअर कराव्यात.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी