शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

तालुक्यातील १६ गावे होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 9:07 PM

वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना होणार मदत : जलयुक्त शिवार अभियान ठरतेय वरदान

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील संरक्षित पाणी साठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे.देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर दिवसरात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली जीवन जगत आहे. शेतकºयांना पीक उत्पादन दुप्पटीने वाढावे म्हणून भुजल पातळीत वाढ करुन सरंक्षीत जलसिंचनात वाढ करण्याच्या दृष्टीने सन २०१५-१६ पासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेतला. या अभियानात अर्जुनी मोरगाव तालुक्यात २०१८-१९ मध्ये १६ गावात पाण्याच्या सरंक्षित सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या तालुकास्तरीय समितीने देऊळगाव (बोदरा) अरततोंडी, तिडका (करडगाव), धाबेटेकडी, चापटी, सुकळी (खैरी), चान्ना (बाक्टी), भुरशीटोला, सिरेगाव, कोहलगाव, पांढरवाणी (रैय्यत), निलज, इंजोरी, चुटिया (पळसगाव), संजयनगर, सोमलपूर या १६ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. तालुक्यात पहिल्या वर्षी २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियानामध्ये ४ गावांची निवड करण्यात आली होती. सन २०१६-१७ मध्ये ९ गावे, २०१७-१८ मध्ये ७ गावे, २०१८-१९ मध्ये १६ गावांची निवड करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे पाण्याच्या संचित साठ्यामध्ये वाढ होते. गावातील पशुधनाला पिण्यासाठी तसेच शेतीचा संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे. पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकºयांना विविध पिके घेता येणार.विविध यंत्रणेची कामेजलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांमध्ये जलसाठा वाढवून पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी जलसंधारण विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वनविभाग, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गंत जलसंधारणाची विविध कामे करण्यात येणार आहेत.तालुकास्तरीय समितीजलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या तालुक्यातील १६ गावातील विविध विकासात्मक आराखडे बनवून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांच्या नियंत्रणाखाली समिती कार्यरत राहणार आहे. यामध्ये तहसीलदार, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी, उपविभागीय अभियंता, उपअभियंता जलसंधारण, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांचा समावेश आहे. ही समिती तालुक्याचा आराखडा मंजूर करुन, वेळोवेळी कामाचा आढावा घेणार आहेत.ही कामे होणारजलयुक्त शिवार अभियानातील गावामध्ये पाण्याचा ताळेबंद तयार करुन गावात आवश्यक असलेले पिण्याचे पाणी, जनावरांसाठी, शेतीसाठी व पडणारा पाऊस याचा पाण्याचा ताळेबंद तयार करुन रब्बी, खरीप व उन्हाळी पिकांसाठी लागणारे सरंक्षीत, ओलीतासाठी लागणारे पाणी याचा ताळेबंद केला जाणार आहे. निवड झालेल्या गावांमध्ये भातखाचरे, दुरुस्ती, बोळी- तलाव दुरुस्ती, सिमेंट नाला बंधारा बांधणे, जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, माती नाला बंधाºयामधील गाळ काढणे, नाला खोलीकरण आदी कामांना प्राथमिकता दिली जाणार आहे.आराखडे तयारनिवड झालेल्या गावांमध्ये प्रस्तावित केलेल्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरु झाले आहे. प्रस्तावित केलेल्या कामाच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी घेवून सदर कामाचे निविदा काढल्या जाणार आहेत. शेतीचा हंगाम संपल्यानंतर निवड झालेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातंर्गत विविध कामे सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारDamधरण