लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन व आरोग्य प्रबोधिनी यांच्या संयुक्त उपक्रमातून तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्तीचे वातावरण जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीच्या तंबाखूविरोधी दिनाचे घोषवाक्य तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध हे दिलेले आहे. याच उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तंबाखूमुक्ती अभियान राबविले जात आहे. याच अंतर्गत जिल्ह्यातील १६०९ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. शासनस्तरावरून विविध पद्धतीने तंबाखूवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु तंबाखूच्या व्यसनाची समाज मान्यता पाहता नुसतं नियंत्रण पुरेसे नाही तर तंबाखूची उपलब्धता कमी करणे, नवीन व्यक्ती तयार होऊ नयेत त्यासाठी प्रयत्न करणे आणि बालमनावर बालपणापासूनच तंबाखूविरोधी संस्कार करणे फार आवश्यक आहेत. तंबाखूची उपलब्धता कमी करण्यासाठी भारत सरकारचा कोटपा कायदा महाराष्ट्र शासनाची तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी विविध शासकीय परिपत्रकाद्वारे तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी केलेली उपाययोजना ज्याद्वारे तंबाखूच्या उपलब्धतेवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अधिकाधिक लोकसहभाग, युवकांची व महिलांची फळी कामाला लागली, तर तंबाखूवर नियंत्रण आणणे सोपे जाते बालमनावर तंबाखूच्या दुष्परिणामांचे परिणाम माहिती व्यापक प्रमाणात दिली तर नवीन पिढी तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहील तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांवर तंबाखूचे दुष्परिणाम कसे भयानक असतात यावर सखोल मार्गदर्शन करण्याची गरज आहे. २०१२पासून आरोग्य प्रबोधिनी आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शिक्षक मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका आशा यांचे मूलभूत प्रशिक्षण सातत्याने सुरू आहे. त्यादृष्टीने अनेक शैक्षणिक संस्था शासनाचे निकष पूर्ण करत तंबाखूमुक्त झाले आहेत अनेक आरोग्य केंद्र तंबाखूमुक्त झाली आहेत. पोलीसपाटलांच्या सक्रिय सहभागाने अनेक गावांमध्ये तंबाखू बंदीची लाट आलेली आहे.
शाळांमध्ये व्यापक जनजागृतीअधिकाधिक विद्यार्थी तंबाखू खर्रा यापासून दूर राहावे, निर्व्यसनी राहावित यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनी घरात तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करावे, शाळांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करावे, तर समाजातील इतर जबाबदार घटकांनी समाजामध्ये तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्यास मदत करावी जेणेकरून भावी पिढी तंबाखूच्या महाभयंकर संकटापासून वाचेल.
वैयक्तिक स्वच्छतेवर होणारे तंबाखूचे दुष्परिणाम मुखाची दुर्गंधी, दातांचा रंग चॉकलेटी काळा होणे, जबड्यांचे विकार, दात ढिलावणे धूम्रपानामुळे व्यक्तीच्या ओठांवर आणि बोटांवर काळे डाग पडणे कॅन्सरची पूर्व लक्षणे म्हणजेच ल्यूकोप्लेकिया व सबम्युकस फायब्रोसिस अशा विकारांची तोंडात निर्मिती होते.तंबाखूच्या सेवनामुळे आजूबाजूचा परिसर हा प्रदूषित आणि अस्वच्छ होतो. सार्वजनिक अस्वच्छतेमुळे विविध संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. मुलांची वाढ खुंटते, स्त्रियांची प्रजननक्षमता कमी होते, स्त्रियांमध्ये वंध्यत्व निर्माण होते.
तंबाखू सोडण्यासाठी हे करा - तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबीयांचा समोर नातलगांसमोर किंवा मित्रांसमोर करा. - जेव्हा तंबाखू सेवनाची इच्छा होते तेव्हा एक ते शंभर अंक मोजा.- तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास आपल्या पूर्वीच्या आनंदी क्षणांना उजाळा द्या.- तंबाखूचे व्यसन असणाऱ्या लोकांपासून दूर रहा,