नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षीत वाहनांची गरज असावी असे शासनाचे निर्देश असतांना गोंदिया जिल्ह्यातील १६७ स्कूल बसेसच्या मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र न घेताच महिनाभरापासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरूच ठेवली आहे.मात्र याप्रकरणी कुठलीच दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घरून शाळेतपर्यंत व शाळेतून घरी सोडण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३९१ स्कूल बस विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बसेस असल्याची नोंद आहे.परंतु यापैकी फक्त २२४ स्कूल बसेस फिटनेस (योग्यता प्रमाणपत्र) घेतले आहेत.१६७ स्कूल बसेसची अद्यापही फिटनेस तपासणी झाली नाही.परिणामी त्या वाहनांवर कारवाईची टांगती तलवार आहे. त्या वाहनांवर दंड अथवा निलंबनाची कारवाई होईल हे सांगता येत नाही. चिमुकल्या पाल्यांच्या उज्वल भविष्यासाठी पालक त्यांच्या शिक्षणावर लाखो रूपये खर्च करून त्यांना शाळेत पाठवितात.परंतु शाळेत जातांना व येतांना ते सुरक्षित आहेत किंवा नाही, याची पडताळणी पालक वर्गाकडूनही होत नाही.त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार सुरू आहे. पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्यता प्रमाणपत्र न घेता रस्त्यावर स्कूल बस चालविणाºया वाहनांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.तीन महिन्यात चार वाहने निलंबितस्कूल बस व्यतिरिक्त सर्वसामान्य व गरीब जनता येण्या-जाण्यासाठी ज्या आॅटो व काळी पिवळीचा आधार घेतात ती वाहने भंगार झालेली आहेत. भंगार वाहनातून लोक प्रवास करतात. परंतु यासंदर्भात कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. कदाचितच वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. एप्रिल ते जून या तीन महिन्यात आॅटो व काळीपिवळी अश्या चार वाहनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.९७ हजाराचा दंड वसूलएप्रिल ते जुलै दरम्यान आतापर्यंत वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाºया नऊ वाहन चालकांकडून ९६ हजार ८०० रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ६ आॅटो व काळीपिवळी चालकांकडून ५७ हजार २०० रूपये दंड, २ स्कूल बसवर १९ हजार दंड व ३ खासगी वाहनांवर २० हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.५ वाहनांचा होणार लिलावउपप्रादेशिक परिवहन विभागाने पकडलेल्या पाच वाहनांचा ३० जुलैला लिलाव होणार आहे. त्यात २ स्कूल बस, १ आॅटो, १ स्कूल व्हॅन व एक मोपेड वाहन अश्या पाच वाहनांचा समावेश आहे.१ ते १४ आॅगस्ट दरम्यान वाहन तपासणीअनफिट वाहने रस्त्यावर धावत तर नाही ना याची तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे १ ते १४ आॅगस्ट दरम्यान तपासणी मोहीम राबवून योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे.
१६७ अनफिट बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:14 PM
चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षीत वाहनांची गरज असावी असे शासनाचे निर्देश असतांना गोंदिया जिल्ह्यातील १६७ स्कूल बसेसच्या मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र न घेताच महिनाभरापासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरूच ठेवली आहे.मात्र याप्रकरणी कुठलीच दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही.
ठळक मुद्देमहिनाभरापासून प्रकार सुरू : फिटनेस प्रमाणपत्र न घेताच स्कूल बसेस रस्त्यावर