लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. येथील जनता आरोग्यासंदर्भात उदासिन आहेच. सोबत आरोग्य यंत्रणाही निरूत्साही आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्याच्या आरोग्य संस्थात १७ प्रकारची औषधीच नाही. जिल्हा औषधी वितरण भांडारात लाखो रूपयांच्या औषधी येऊन पडल्या आहेत. परंतु त्या औषधांची गुणवत्ता नियंत्रण कार्यालयाकडून औषधी योग्य असून वाटप करा असे पत्र न मिळाल्यामुळे ती औषधी तशीच पडून आहे.गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २३९ उपकेंद्र आहेत. परंतु या आरोग्य संस्थामध्ये १७ प्रकारच्या औषधी नाहीत. औषध भांडारात औषध उपलब्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून औषधांची मागणीच होत नसल्याचे औषध भांडारातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बहुतांश औषधी उपलब्ध असली तरी १७ प्रकारची औषधी उपलब्ध नसल्याची ओरड जिल्ह्यात आहे.या १७ प्रकारच्या औषधांचा साठा औषध भांडारात उपलब्ध आहे. परंतु त्या औषधांची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी नागपूरच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे औषधांचे नमुने पाठविण्यात आले आहे.परंतु तिथून त्या नमुन्यांची तपासणी होऊन अहवाल प्राप्त न झाल्याने ग्रामीण भागात या औषधांचे वाटप करण्यात आले नाही. अॅन्टीबायोटीक म्हणून वापरली जाणारी सिफलोक्लोक्सासीन, शर्करावर चालणारी ग्लीकाझाईड, ग्लीमीपराईड, उलटीसाठी असलेली डोमपॅरीडॉन, रक्तदाबासाठी असलेली एम्लोडेपीन, अॅटेनॉल, मेटॅप्रोलाल, क्लोरथॉराडीन, पोटदुखीसाठी असलेली डायसाक्लोमीन, पाणी शुध्द करण्यासाठी असलेली औषधी सोडीयम हायपोक्लोराईन सोल्यूशन, उच्च रक्तदाबासाठी असलेली आॅटोवास्टासिन, दुखण्यासाठी असलेली डायक्लोफीनॅक सोडीयम, पॅरासिटामल, रक्त वाढविण्यासाठी असलेले आयरन सुक्रोज इंजेक्शन व दमासाठी लागणारे सालबुटामोल व इथीओफायलीन ही औषधी औषध भंडारात उपलब्ध असूनही गुणवत्ता नियंत्रण अहवाल आल्याशिवाय वाटप करता येत नाही.३३ लाखाची औषधी पडून, पण वाटप होेईनाप्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात औषधांचा तुटवडा आहे. गुणवत्ता नियंत्रणाचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे १७ प्रकराच्या ह्या औषधी उपलब्ध असूनही वाटता येत नाही. ३३ लाख ३९ हजार ४६५ रूपये १७ पैश्याच्या औषधी गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून औषधी ओके असल्याचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे त्या औषधांना जिल्ह्यात वाटता येत नाही.गोरगरिब रुग्णांना आर्थिक फटकाग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये गोरगरीब रुग्णांचा समावेश आहे. मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र औषध उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरून औषधी करावी लागत आहे.यामुळे त्यांना आर्थिक भूर्दंड बसत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत १७ औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:00 AM
गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २३९ उपकेंद्र आहेत. परंतु या आरोग्य संस्थामध्ये १७ प्रकारच्या औषधी नाहीत. औषध भांडारात औषध उपलब्ध असून प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून औषधांची मागणीच होत नसल्याचे औषध भांडारातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. बहुतांश औषधी उपलब्ध असली तरी १७ प्रकारची औषधी उपलब्ध नसल्याची ओरड जिल्ह्यात आहे.
ठळक मुद्देगुणवत्ता नियंत्रणामुळे लागतो उशीर : महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा, प्रमाणपत्र न मिळाल्याने समस्या