शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अतिदक्षता कक्षात १७० नवजातांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 9:18 PM

शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देगंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रकार : व्यंगत्वामुळे होतो नवजात बालकांचा मृत्यू

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन माता व बाल मृत्यूवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असले तरी बालमृत्यूचे तांडव थांबता थांबेना अशी स्थिती दिसून येत आहे. येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात नवजात बालकांची काळजी घेण्यासाठी उत्कृष्ट असे नवजात अतिदक्षता कक्ष उभारण्यात आले आहे. तरीही या कक्षात वर्षभरात १७० बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ८३० बालकांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयात वर्षाकाठी नऊ हजार महिलांची प्रसूती होते. मनुष्यबळ अभावी येथील डॉक्टरांवर कामाचा ताण असतो. नवजात अतिदक्षता कक्षात बालरोग तज्ज्ञ नसल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात दोन हजार नवजात बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापैकी एक हजार ८३० बालकांवर उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र १७० बालकांवर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.यात ७०० ग्रॅम व त्यापेक्षा कमी वजन असलेल्या २० बालकांचा मृत्यू झाला. एक किलो वजनापेक्षा कमी २५ बालकांचा, दोन किलो पेक्षा कमी वजनाच्या २५ बालकांचा, गर्भातच व्यंगत्व आल्यामुळे ५० बालकांचा तर इंफेक्शनमुळे ५० बालकांचा मृत्यू झाला आहे. या दोन हजार बालकांच्या मातांपैकी ४६७ मातांची प्रसूती गंगाबाईत झाली नसून बाहेर प्रसूती झाल्यानंतर त्यांच्या बाळांना उपचारासाठी गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणण्यात आले होते. गंगाबाईत दाखल झालेल्या बालकांपैकी ८.२ टक्के बालकांचा मृत्यू होत असल्याचे चित्र पुढे आले आहे.व्यंगत्वामुळे सर्वाधिक बालकांचा मृत्यूआईच्या गर्भातच अर्भकाची वाढ व्हावी यासाठी त्यांना संतुलीत आहार देणे आवश्यक असते. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला व विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु गर्भावस्थेत गर्भवतींकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे हृदयविकार, फुफुसाचे व्यंगत्व, मेंदू व किडणी यांच्यात व्यंगत्व येते. व्यंगत्व व इंफेक्शनमुळे समान मृत्यू होण्याचा दर मागील वर्षीची आकडेवारी दाखविते.तीन व्हेंटिलेर बंदचगंगाबाई स्त्री रूग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात चार व्हेंटीलेटरची गरज आहेत. परंतु सद्यस्थितीत फक्त एकच व्हेंटीलेटर सुरू आहे. तीन व्हेंटीलेटर बंद आहेत. त्यामुळे नवजात बालकांचा उपचार करण्याची अडचण येत असून त्यामुळे चिमुलकल्यांचा मृत्यू तर होत नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे.व्यवस्था ३२ ची ठेवतात ५० रूग्णनवजात अतिदक्षता कक्षात ३२ बालके एकासोबत दाखल राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु ३२ बालकांचीच व्यवस्था असताना गंगाबाईतील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहता एकाच वेळी आजघडीला ५० चिमुकल्यांवर उपचार करण्यात येतो. बालरोग विभाग ४० बेडचा आहे. परंतु त्या ठिकाणीही हीच अवस्था आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल