लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस विभाग कामाला लागला आहे. यातच शनिवारी (दि. १०) अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम धाबेटेकडी येथे सर्रास अवैध दारुची विक्री करणाऱ्या दोघांना पकडले. रात्री ८ वाजता आरोपी सुभाष धनीराम डोंगरवार (३२) व कैलाश धनीराम डोंगरवार (४०, दोन्ही रा. धाबेटेकडी) यांच्या घरात व अंगणात तणसाच्या ढिगात ६०० बाटल्या देशी संत्रा दारू व विदेशी दारूच्या ११ बाटल्या असा एकूण १७ हजार १४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर बोरकर करत आहेत.