शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

ग्रामीण रस्त्यांसाठी १.७२ कोटींचा निधी

By admin | Published: September 09, 2014 12:29 AM

विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठी राज्य शासनाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत.

गोंदिया : विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील रस्ते बांधकामासाठी राज्य शासनाने १ कोटी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाने या संदर्भात ३ सप्टेंबर रोजी आदेश काढले आहेत. क्षेत्रात घेण्यात आलेल्या ग्रामसभा तसेच जनसंपर्क दौऱ्यांतर्गत कार्यकर्ता व नागरिकांनी रस्ता बांधकामाला घेऊन केलेल्या मागणी केली होती. या मागण्यांना गांभीर्याने घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हा नियोजन समितींतर्गत १ कोटी ७२ लाख रूपयांच्या निधीतून गाव जोड रस्ते बांधकामास मंजूरी देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी केली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने अखेर १ कोटी ७२ लाख रूपयांच्या रस्ते बांधकामाला मंजूरी देत ३ सप्टेंबर रोजी तसे आदेश काढले. या निधीतून ग्राम सावरी- लोधीटोला, ईर्री- कामठा, पिंडकेपार- सेंद्रीटोला, संजयनगर- पिंडकेपार, पिंडकेपार ग्राम अंतर्गत रस्ता, कटंगी ग्राम अंतर्गत रस्ता, आसोली ग्राम अंतर्गत रस्ता, सतोना- धामनगाव-बनाथर ते जनगटोला रस्ता, आसोली-पाटीलटोला- टेमनी रस्ता, आसोली- नवरगाव रस्ता, बिरसी- दासगाव रस्ता, सिवनीटोला- गर्रा रस्ता, सावरी- अर्जुनी रस्ता तसेच नवरगावकला- करंजी रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यातील नवरगावकला-करंजी रस्ता बांधकामाची मागणी मागील कित्येक वर्षांपासून केली जात होती. मात्र नवरगावकला गोंदिया विधानसभा क्षेत्रात तर करंजी आमगाव विधानसभा क्षेत्रात येत असल्याने यासाठी निधी मिळत नव्हता. मात्र शासनाने आता या रस्ता बांधकामासाठी २० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. पावसाळा संपताच या सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले जाणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे.