तिरखेडी येथील घटना : ४ लाख ७० हजारांचे दागिने पळविले होते गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या तिरखेडी येथील गजानन पृथ्वीराज कटरे (६७) यांच्या घरातून २९ सप्टेंबरच्या पहाटे ४ लाख ७० हजार किमतीचे दागिने पळविण्यात आले होते. ते दागिने चोरणारा कुणी दरोडेखोर नाही तर घरातीलब पुतण्या निघाला आहे. सालेकसा पोलिसांनी त्याला मंगळवारी त्याला ताब्यात घेतले आहे. कृणाल उर्फ निहाल मधुकर कटरे (१९) रा. तिरखेडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, पोलीस नायक पंकय दिक्षीत, सुनिल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे व चालक खेमराज खोब्रागडे यांनी केली आहे. आरोपीने ४५ ग्राम वजनाच्या सोन्याचा हार किंमती १ लाख १२ हजार ५०० रुपये, पाच नग सोन्याचे शिक्के ५० ग्राम वजनाचे किंमती १ लाख २५ हजार रुपये, १० ग्राम वजनाची सोन्याची साखळी किंमत २५ हजार रुपये, १० ग्राम वजनाचे १ जोड सोन्याचे टॉप्स किंमत २५ हजार , सोन्याचे लटकण १० ग्राम वजनाचे किंमत २५ हजार, ३ ग्राम वजनाच्या बिऱ्या, ५ ग्राम वजनाच्या बिऱ्या किंमत १२ हजार ५०० रुपये २ ग्राम वजनाच्या खडा किंमत ५ हजार, २० ग्राम वजनाची सोन्याची साखळी किमत ५० हजार रु. ५ ग्राम वजनाची साखळी १५ हजार २५० रुपये, १० ग्राम वजनाचा मंगळसुत्र किंमत ३२ हजार ५०० रुपये, काळे मनी असलेला १३ ग्राम वजनाचा मंगळसुत्र किंमत १२ हजार ५०० रुपये, तीन जोड सोन्याचा बिऱ्या १० ग्राम वजनाचा किंमत २५ हजार असा एकूण ४ लाख ७० हजाराचा माल पळविला होता. त्याने गाव पजरसरातच सदर दागिणे लपवून ठेवले होते. सालेकसा पोलिसांनी त्याच्याविरूध्द भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले १० हजारांचे बक्षीस ४सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तिरखेडी येथील १८ तोळे दागिणे पळविण्यात आले होते. ४ लाख ७० हजाराचे दागिणे पळविणाऱ्या आरोपीचा सुगावा लावणाऱ्या सालेकसा पोलिस ठाण्यातील त्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना बक्षीस म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी १० हजार रुपये दिले आहेत. व इतर सुविधा देण्याचे मान्य केले.
१८ तोळे सोने चोरणारा निघाला पुतण्या
By admin | Published: October 15, 2016 12:23 AM