शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१८० दारू दुकाने व बारवर येणार संक्रांत

By admin | Published: January 19, 2017 1:24 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय व राज्य मार्गापासून ५०० मिटर अंतरावरील मद्यविक्रीची

 ५०० मीटरचा नियम : अर्ध्यापेक्षा जास्त परवानाधारकांना बदलवावी लागणार जागा मनोज ताजने  गोंदिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय व राज्य मार्गापासून ५०० मिटर अंतरावरील मद्यविक्रीची दुकाने आणि बार हटविण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यात २३८ पैकी १८० दारू दुकाने व बार ५०० मिटरच्या आत आढळले आहेत. या सर्वांना येत्या ३१ मार्चपर्यंत आपले स्थान बदलवावे लागणार आहे. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अनेक मद्यविक्रीच्या दुकानांना १ ते ५ वर्षपर्यंत परवाने मिळाले आहेत. मात्र नवीन आदेशानुसार महार्गालगत ५०० मीटरच्या आत येणाऱ्या दुकानांचे परवाने केवळ ३१ मार्च २०१७ पर्यंत वैध राहणार आहेत. त्यानंतर संबंधित परवानाधारकांना आपले बार किंवा दुकान योग्य ठिकाणी स्थानांतरित केल्यानंतरच नवीन परवाना दिला जाणार आहे. या नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यापूर्वी किती दुकाने आणि बार स्थानांतरण करण्यासाठी ५०० मीटरच्या आत येतात याचे सर्व्हेक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले. त्यानुसार त्या सर्वांना ३१ मार्च २०१७ पर्यंत दुसऱ्या जागेवर स्थानांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १ एप्रिल २०१७ नंतर ५०० मीटरच्या कक्षेतील हे सर्व परवानाधारक विनापरवाना होणार आहेत. सर्व्हेक्षणानुसार चिल्लर देशी दारू विक्रीची ५७ दुकाने, ८ वाईन शॉप, १०८ बार आणि ७ बिअर शॉपी ५०० मीटरच्या आत आहेत. रस्त्यावरील अपघातांसाठी मद्यप्राशन करून वाहन चालविणे ही बाब कारणीभूत ठरत असल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने देशभरात हा नियम लागू करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त व्ही.राधा यांनी याबाबतचा अध्यादेश जारी केला. विशेष म्हणजे हे निर्बंध नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत अशा स्थानिक प्राधीकरणाच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दुकाने-बारलाही हा नियम लागू राहणार आहे. आता बांधकाम विभाग करणार पुर्नसर्वेक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१२ रोजी एक बैठक झाली. त्यात उत्पादन शुल्क विभागाच्या सर्र्वेेक्षणासोबत सार्वजनिक बांधकाम विभागानेही पुनर्सर्व्हेक्षण करावे, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बार मालकांना हवी मुदत या निर्णयामुळे सर्व मद्यविक्री परवानाधारकांसह बारमालकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी सुरू आहे. निर्णयावर फेरविचार करून ५०० मीटर अंतराऐवजी २०० मीटर अंतराची अट लागू करावी, किंवा दुकाने हटविण्यासाठी ३१ मार्चऐवजी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत द्यावी अशीही मागणी केली जात आहे.