गोंदिया : अवैधरीत्या दारू विक्री करीत असलेल्या तिघांना पोलिसांनी दणका दिला असून, त्यांच्याकडून देशी दारूच्या २० पेट्या जप्त करण्यात आल्या आहेत. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम जमाकुडो येथे गुरुवारी (दि. २४) ही कारवाई करण्यात आली असून, जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ५३६१६ रुपये आहे.
सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले, सहकारी सहगायक फौजदार खापेकर, कटरे, हवालदार शहारे, शिपाई सोनी यांच्यासोबत परिसरात पट्रोलिंगवर असताना त्यांनी ग्राम जमाकुडो येथील महिला सुरक्षा समिती सदस्यांच्या मदतीने जशोदा बाबूलाल बांगरे (वय ६०), पद्मा रवि कोडापे (४२) व अमित दुकालूसिंग सिरसाम (३२) यांच्या घरावर छापा टाकला. यात तिघांच्या घरात अवैधरीत्या साठवून ठेवलेली देशी दारू आढळली असून, पोलिसांनी २० पेट्यांमधून देशी दारूचे ९७२ पव्वे असा ५३६१६ रुपयांचा माल जप्त केला. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गु्न्हा नोंद करण्यात आला आहे.