शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
13
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
14
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
15
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

२० हजार शेतकरी सावकारांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 10:25 PM

जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.

ठळक मुद्देयादी न आल्याने समस्या : शेतकऱ्यांचा हंगाम संकटात, बँकेचे कर्मचारी तणावात, प्रशासनाची बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. परिणामी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून खरीप हंगाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची आणि सावकारांच्या दारात उभे राहण्याची पाळी आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाखांवर शेतकरी आॅनलाईन अर्ज केले होते. अर्जाच्या पडताळणीनंतर जिल्ह्यातील ८३ हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. त्यापैकी जुलै अखेर ६३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून त्यांच्या बँक खात्यावर १४५ कोटी रुपये जमा करण्यात आले. मात्र उर्वरित शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांना प्राप्त झाली नाही.परिणामी मागील सहा महिन्यापासून २० हजार शेतकरी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाच्या पायऱ्या झिजवित आहेत.शेतकरी कर्जमाफीची यादी आली का म्हणून दररोज बँकाच्या पायऱ्या झिजवित आहे. तर बँका शेतकऱ्यांना महाआॅनलाईनकडून ग्रीन यादी आली नसल्याचे सांगत आहे. तर सध्या रोवणीची कामे जोमात सुरु असून शेतकऱ्यांना खते आणि मजुरीचा खर्च देण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना नातेवाईक आणि सावकारांकडून कर्ज घेण्याची पाळी आली आहे.जुने माफ होईना नवीन मिळेनाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे निश्चित आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जर कर्जाची रक्कम भरली तर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर दुसरीकडे जोपर्यंत त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होवून त्यांचे खाते शून्य होत नाही, तोपर्यंत त्यांना नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे जुने माफ होईना आणि नवीन पीक कर्ज मिळेना अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.व्याजाचा दर वाढलासध्या खरीप हंगाम सुरू असून रोवणीची कामे सुरु आहे. वेळेवर रोवणी झाली नाही तर शेतकºयांना हंगामाला मुकावे लागेल. त्यामुळे वर्षभर कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हंगाम हातून जावू नये यासाठी शेतकरी सावकारांच्या दारात जात आहे. मात्र सावकार शेतकऱ्यांच्या झालेल्या कोडींचा फायदा घेत असून दहा ते बारा टक्के व्याजाची आकारणी करीत असल्याची माहिती आहे.वर्षपूर्तीनंतरही तिढा कायमराज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला नुकताच वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्णपणे लाभ मिळालेला नाही. तर कर्जमाफीच्या ग्रीेन याद्यांवरुन दिवसेंदिवस तिढा वाढत असल्याचे चित्र आहे.महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंबकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी होवून अंतीम ग्रीन शासनाने नियुक्त केलेल्या महाआॅनलाईनकडून बँकांना पाठविली जात आहे. त्यानंतर बँका शेतकऱ्यांच्या बँकाखात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करुन त्यांचे खाते शून्य करीत आहे. मात्र महाआॅनलाईनकडून याद्या मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकांची कोंडी होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता बँक कर्मचाऱ्यांची दमच्छाक होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज