गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी गावातील तंटे गावगाड्यातून सोडविण्याचा उपक्रम नोंदविला. मात्र पाच वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर तंटामुक्त मोहिमेसंदर्भात समित्यांमध्ये उदासिनता वाढू लागली. जिल्ह्यातील समित्यांपुढे २१ हजार ६५८ तंटे सोडविण्यासाठी आहेत. शासनाच्या नियोजनाअभावी तंटामुक्त समितीचे कार्य मंदावत आहे.जिल्ह्यात ५५६ तंटामुक्त गाव समित्या आहेत. या समित्यांनी दिवाणी स्वरुपाचे एक हजार ६८२ तंटे दाखल केले. यातील ८६३ तंटे समोपचाराने सोडविण्यात आले. मात्र ८१९ तंटे आजही समित्यांकडे पडून आहेत. महसूली स्वरुपाची २१३ तंटे समित्यांकडे दाखल केले. त्यातील १९१ तंटे समित्यांनी दोन्ही पक्षाला एकत्र बोलावून सोडविले. यातील २२ तंटे सोडविण्यासाठी समित्यांकडे पडून आहेत. फौजदारी स्वरुपाची ६३ हजार २११ तंटे दाखल करण्यात आले. यातील ४२ हजार ३९६ तंटे समोपचाराने सोडविण्याता आले. फौजदारी स्वरुपाची २० ६ जार ८१५ तंटे आजही समित्यांच्या दालनात सोडविण्यासाठी पडून आहेत. ईतर स्वरुपाची ७४ तंटे दाखल करण्यात आले.यातील ७२ तंटे सोडविण्यात आले आहेत. ईतर स्वरुपाचे दोन तंटे अद्याप सोडविल्या गेले नाही. जिल्ह्यात दिवाणी, महसूली, फौजदारी व ईतर स्वरुपाची असे एकूण ६५ हजार १८० तंटे दाखल करण्यात आले. यातील ४३ हजार ५२२ तंटे समोपचाराने सोडण्यिात आले.जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यांनी दाखल केलेल्या तंट्यांपैकी सोडविण्यात आलेल्या तंट्यांची टक्केवारी ६६.७७ आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांतर्गत जुलै महिन्यापर्यंत दखलपात्र स्वरुपाची ११७ प्रकरणे दाखल केली होती. मात्र यावर्षी १३० प्रकरण दाखल करण्यात आले. अदखल स्वरुपाची ५३५ मागीलवर्षी दाखल केले होते. यावर्षी ५३१ तंटे दाखल करण्यात आले आहे. तंटामुक्त गाव मोहीम शासन तारखे निहाय अमंलबजावणी करीत नसल्याने समिती उदासिन होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यातील तंटामुक्त समित्यांच्या दालनात २१ हजार ६५८ तंटे
By admin | Published: July 23, 2014 11:42 PM