लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : जिल्ह्यातील पाण्याची टंचाई अधिकच गंभीर होत चालली असून रखरखत्या उन्हामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यातील ३८ पैकी २३ जुने मालगुजारी तलावांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. तर उर्वरित तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याला बारामाही पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून जुने मालगुजारी तलाव तयार करण्यात आले होते. एकेकाळी जुन्या मालगुजारी तलावांच्या भरवशावर शेती, मनुष्य व पशुंची तहान भागविली जात होती. त्यानंतरही तलाव पाण्याने लबालब राहत होते. त्यावेळचे पाण्याचे व्यवस्थापन आजच्या पिढीलाही पाणी पाजत आहे. मात्र आजची पिढी पुढच्या पिढीसाठी काहीच करू शकली नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात असलेल्या ३८ मालगुजारी तलावांची स्थिती गंभीर आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील ३८ पैकी २३ तलाव आटले आहेत. विशेष म्हणजे, उर्वरीत तलावांची स्थिती फारशी चांगली नाही. कारण उरलेल्या तलावांतही नाममात्र पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पाऊस पडत नाही तोवर या तलावांचाही जीव जाणार यात शंका नाही. मालगुजारी तलावांमुळे संबंधीत गावातील मनुष्य व पशुंची पाण्याची समस्या सुटते. शिवाय कित्येक गावांतील शेतीही या तलावांच्या भरोश्यावर फुलते. आता या तलावांनी तळ गाठला असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या किती बिकट असेल याची कल्पना येते.तलावांना जीवदान देण्याची गरजमालगुजारी तलावांची हीच स्थिती राहिल्यास आजचे चित्र बघता येणारा काळ जिल्ह्यावासीयांना किती कठीण जाणार याची कल्पना करता येते. अशात य मालगुजारी तलावांची सफाई तसेच गाळ काढून त्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. पाणी टंचाईवर बऱ्याच प्रमाणात मात करणे शक्य होईल.हे तलाव झाले कोरडेपाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्यास्थितीत ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना-बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाडी, फुलचूर, गोठणगाव, गिरोला, गंगेझरी, कोहलगाव, कोसबीबकी, ककोडी, खमारी, कोसमतोंडी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, मालीजुंगा, नांदलपार, पळसगाव-डव्वा, तेढा व ताडगाव या मालगुजारी तलावांत पाण्याचा ठणठणाट आहे. शिवाय येणाºया काही दिवसांत यात आणखी काही तलावांचा भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.फक्त तीनच तलावांत २० टक्के पाणीसाठाजिल्ह्यातील धाबेटेकडी, माहुरकुडा व सौंदड या तीन तलावांत आज २० टक्केच्यावर पाणीसाठा आहे. तर कवठा व माहुली या दोन तलावांत १५ टक्केच्यावर पाणीसाठा आहे. त्यानंतर मुंडीपार (१४.६८ टक्के) तलाव सोडून उर्वरीत तलावांत मात्र १० टक्केच्या आतच पाणीसाठा आहे.
२३ मालगुजारी तलावांनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:16 PM
जिल्ह्यातील पाण्याची टंचाई अधिकच गंभीर होत चालली असून रखरखत्या उन्हामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. सध्या स्थिती जिल्ह्यातील ३८ पैकी २३ जुने मालगुजारी तलावांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. तर उर्वरित तलावातही अत्यल्प पाणीसाठा आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात ३८ मालगुजारी तलाव : अन्य तलावात अत्यल्प पाणीसाठा, पाणी टंचाईत वाढ