शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

जिल्ह्यातील २४० शाळांचे होणार सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:53 PM

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया शाळा निर्माण करणे व शाळा सिद्धीत गुणांकन वाढविणे ....

ठळक मुद्देप्रत्येक तालुक्यातील ३० शाळांचा समावेश : गुणवत्तापूर्ण शाळा तयार करण्याचे ध्येय

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाºया शाळा निर्माण करणे व शाळा सिद्धीत गुणांकन वाढविणे हे उद्देश समोर ठेवून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेकडून १ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या तीन महिन्यात जिल्ह्यातील विशेष सहाय्याची गरज असलेल्या २४० शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील आठही तालुक्यातून प्रत्येकी ३० शाळांचा समावेश करण्यात आला आहे.महाराष्टÑ शासनाने मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम २०१५ पासून सुरू केला. त्यामुळे जिल्ह्यातील ७०९ शाळा प्रगत झाल्या आहेत. शाळा डिजीटल झाल्या व विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावाद व कृतीयुक्त शिक्षण दिले जात आहे. शाळांमध्ये आयएसओ होण्यासाठी स्पर्धा वाढत आहे. आरटीई कायद्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला. आता विद्यार्थ्यांसाठी फक्त शाळाच नको तर त्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे पालकांना अपेक्षीत आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढत आहे. सर्वच शाळांत डिजीटल साधनांचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. तरीही मागासलेल्या शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी आता वर्ग १ ते ८ पर्यंतच्या २४० शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील ३० शाळा अशा आठ तालुक्यातील २४० शाळांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी आराखडा तयार केला असून या उपक्रमाची अमंलबजावणी करण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकाºयांची बैठक घेण्यात आली आहे. विशेष सहाय्याची गरज असलेल्या शाळांची १०० टक्के गुणवत्ता विकसीत केली जाणार आहे.प्रत्येक शाळेत डीएडचे ४० विद्यार्थीगोंदिया जिल्ह्यातील २४० शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी तालुक्यातील बीआरसी स्तरावर कार्यरत विषयसाधन व्यक्ती व समावेशित विषयतज्ज्ञ यांच्यामार्फत नियोजनबद्ध कार्य करण्यात येत आहे. त्यांच्या मदतीला डीएडचे विद्यार्थी समाजसेवा शिबिरांतर्गत त्या शाळांत स्वच्छतेपासून सर्वच बाबींसाठी मदत करणार आहेत. प्रत्येक शाळेत डीएडचे ४० विद्यार्थी जाणार आहेत. विषयसाधन व्यक्ती व विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांचा स्तर निश्चीत करतील, विद्यार्थ्यांना कृतीयुक्त मार्गदर्शन व शिक्षकांना प्रात्यक्षिक देणे, शिक्षकांच्या अडचणी शोधून त्या दूर करणे, शिक्षकांना कार्यप्रवण करणे, भाषा, गणित व इंग्रजी विषयाचे शंभर टक्के कौशल्य मिळविणे, समाज सहभागासाठी व्यवस्थापन समितीची सभा, ग्रामपंचायत भेटी व ग्रामस्थांच्या भेटी घेणे, शाळांची प्रतवारी उंचावणे, शाळा प्रगतीचे अहवाल सादर करणे व शिक्षक परिषदांचे आयोजन करून चांगले कार्य करणाºया शिक्षकांना व्यासपीठ देण्याचेही काम केले जाणार आहे.विद्यार्थ्यांचे हे गुण विकसित करणारया उपक्रमात निवड करण्यात आलेल्या शाळांमधील १०० टक्के विद्यार्थ्यांची मराठी वाचन क्षमता विकसित करणे, गणित संबोध विकसित करणे, इंग्रजी वाचन क्षमता विकसित करणे, विद्यार्थी व शिक्षकांची स्पोकन इंग्लिश क्षमता विकसित करणे, विद्यार्थी व शिक्षकांचे विज्ञान संबोध विकसित करणे, शाळेतील सर्व विषयांत तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करणे, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे, अध्ययन अध्यापनात कृतीयुक्त पद्धतीने सामानीकरण रूजविणे, सामाजिक शास्त्राची स्पर्धा परीक्षेशी सांगड घालणे, शाळेतील संलग्न अंगणवाडी सेविकांचे अध्ययन अध्यापनात प्रगल्भीकरण करणे, शाळेत लोकसहभागातून भौतिक सुविधा मिळविणे, ज्ञानरचनावाद व आनंददायी पद्धतीने शिकविण्यास शैक्षणिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे.या उपक्रमामुळे ९० टक्के विद्यार्थी वाचायला लागतील. गणीत संबोधाची समस्या सुटेल. गोंदिया तालुक्यात यापूर्वी टेमणी व नागरा (मुले) या दोन शाळांत २४ दिवस इंग्लिश स्पोकनचा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगामुळे वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी तुटक-फुटक इंग्रजी बोलू लागले. त्या विद्यार्थ्यांचा सभाधीटपणा वाढला.-राजकुमार हिवारेप्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था, गोंदिया.