लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील लोकवर्गणीतून साकारात असलेल्या हिलटॉप गार्डनला े पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. तसेच नवेगावबांध फाऊंडेशन व स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या युवा कार्यकर्त्यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली. या वेळी सदर उद्यानाच्या पुनर्जीवनासाठी त्यांनी २५ लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.पालकमंत्री अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या दौºयावर असताना नवेगावबांध विश्रामगृहावर वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर व सहकाºयांनी त्यांची भेट घेवून त्यांना हिलटॉप गार्डनला भेट देण्याची विनंती केली. नवेगावबांध फाऊंडेशनने नवेगावबांध राष्टÑीय उद्यानाच्या विकासासाठी ५० कोटींच्या विकास आराखडा तयार करण्यास होणाºया विलंबामुळे आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे पालकमंत्री नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी हिलटॉप गार्डनला भेट देण्यासाठी टाळाटाळ केली. परंतु २० जुलै २०१७ ला विकास आराखड्याबाबत शासनस्तरावर कुठल्याही हालचाली अद्याप दिसून येत नाही. हे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास बोरकर यांनी आणून दिल्यावर ते भेट द्यायला तयार झाले.या वेळी पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. उपाध्यक्षा रचना गहाणे, अर्जुनी-मोरगाव तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, केवळराम पुस्तोडे, तहसीलदार बांबोळे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी नवेगावबांध फाऊंडेशनने निवेदनात नमूद केलेल्या स्थळांच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलले जातील, याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.फाऊंडेशनच्या युवकांनी उभारलेल्या स्तुत्य उपक्रमाला अडवणूक करु नका, त्यांना प्रोत्साहन कसे देता येईल याचा विचार करा, पर्यटन विकासाचा युवकांनी घेतलेला मार्ग सर्वोतोपरी योग्य असून सहकार्याची विनंती फाऊंडेशनचे सल्लागार अमृतलाल टाक यांनी पालकमंत्र्यांना केली. फाऊंडेशनने हाती घेतलेल्या नवेगावबांध पर्यटन विकासाचा उपक्रम कुणाच्या विरोधासाठी हाती घेतला नाही. तर या परिसराच्या विकासासाठी पालकमंत्र्यांनी ५० कोटीचा विकास आराखडा तयार करुन शासनाकडून तो मंजूर करुन घेण्याचे दिलेले आश्वासन पालकमंत्र्यांनी पूर्ण करावे. विकासासाठी निधी मंजूर करावा व तो उपलब्ध करुन देण्याची मागणी या वेळी केली. पालकमंत्री २५ लाखांचा निधी देतात म्हणून आम्ही आंदोलन करणार नाही, असे होणार नाही. ५० कोटींचा विकास आराखडा मंजूर होत नाही, तोपर्यंत फाऊंडेशन आपल्या आंदोलनावर ठाम राहील, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.आज होणार बैठकदरम्यान संपूर्ण पर्यटन संकुल परिसराच्या व्यवस्थापनाकरिता नवेगावबांध येथील संकुलात जिल्हाधिकारी, वनविकास महामंडळाच्या अधिकाºयांसोबत शुक्रवारी २७ आॅक्टोबरला बैठक घेणार असल्याचे रामदास बोरकर यांनी सांगितले आहे. या बैठकीला वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
हॉलीडे होम्स गार्डनच्या नूतनीकरणासाठी २५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:41 AM
येथील लोकवर्गणीतून साकारात असलेल्या हिलटॉप गार्डनला े पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. तसेच नवेगावबांध फाऊंडेशन व स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या युवा कार्यकर्त्यांच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांची घोषणा : नवेगावबांध फाऊंडेशन आपल्या आंदोलनावर ठाम