शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

देवरी व सालकेसा तालुक्यात २५ धान खरेदी केंद्रांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:46 AM

जिल्हाधिकाºयांनी आदिवासी विकास महामंडळाच्या देवरी येथील उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत देवरी व सालेकसा अशा दोन तालुक्यांत एकूण २५ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देदेवरी व सालेकसा अशा दोन तालुक्यांत एकूण २५ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : जिल्हाधिकाºयांनी आदिवासी विकास महामंडळाच्या देवरी येथील उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत देवरी व सालेकसा अशा दोन तालुक्यांत एकूण २५ आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे.या अंतर्गत बुधवारी (दि.२५) देवरी तालुक्यात चिचगड, डवकी, गणुटोला, धमदीटोला, चिचेवाडा व अंभोरा असे सहा व सालेकसा तालुक्यात सालेकसा येथे एक असे सात खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. या सर्व धान खरेदी केंद्रांवर शासनातर्फे धानाचे दर ‘ए’ ग्रेड कॉमन १५९० रुपये आणि ‘सी ग्रेड’ कॉमनकरिता १५५० रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे.चिचगड व डवकी येथील धान खरेदी केंद्रांचा शुभारंभ आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांच्या हस्ते आणि देवरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक टी.एन. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी चिचगड येथे संस्थेचे सचिव एम.एल. खंडारे, संचालक प्रभाकर कोल्हारे, भूवन नरवरे तर डवकी येथे संस्थेचे अध्यक्ष मेहतरलाल कोराम, उपाध्यक्ष भाष्कर धरमशहारे, सचिव प्रकाश येल्ले यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.